सिरोंचा तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने निषेध करत तहीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन….!
सिरोंचा :- दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी ,पुणे येथे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विश्वांभर चौधरी, ॲड.असिम सरोदे हे निर्भय बनो या कार्यक्रमासाठी जात असतांना हल्लेखोरानी अतिशय क्रुरपणे त्यांच्या गाडीवर हल्ला केला. गाडीचा चालक वैभव यांनी आपला जीव वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत स्वतःचा व वरील व्यक्तींचा बचाव केला.
लोकशाहीत चौथा स्तंभ म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या आमच्या पत्रकारांवर दिवसां दिवस हल्ले वाढत आहे,
या हल्ल्याचा महाराष्ट्रातील विवीध पत्रकार संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करत आहेत.
त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार तसेच प्रिंट मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आले आहे.
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्ले खोरांवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात यावे, अशी तालुका डिजिटल मीडिया पत्रकार तथा प्रिंट मिडिया पत्रकार बांधवांनी तहसीलदार जितेन्द्र सिकतोडे यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन पटवून मागणी करण्यात आले आहे,
त्यावेळी डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष – रवि भाऊ साल्लम, उपाध्यक्ष – सागर मुलकला, सह सचिव – विनोद नायडू, सदस्य – सुधाकर सिडाम, गणेश संड्रा,प्रिंट मिडिया पत्रकार संघटनेचे पत्रकार – सुरेश त्रिपटी, तटीकोंडावार, ज्येष्ठ पत्रकार – रामचंद्र कुम्मरी, यांची उपस्थिती होते,