शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख सत्यनारायण बुर्रावार यांची मागणी.
.सिरोंचा तालुक्यातील खंडित वीजपुरवठा आणि कमी व्होल्टेज ची समस्या कायमची दूर करण्या बाबत 4..5 वर्षापूर्वी तत्कालीन सरकारने सिरोंचा मुख्यालयात 132kva चे विद्युत सबस्टेशन आणि विद्युत टावर लाईन मंजूर केले. या 132kv विद्युत सबस्टेशन ला तेलंगाना राज्यातील किष्ठमपेठ या गावापासून विद्युत टावर लाईन ने विद्युत पुरवठा करण्याचे ठरवून विद्युत लाईन जोडण्याचा कामाला मंजुरी देण्यात आली. टेंडर प्रक्रियेनंतर कंत्राटदारां मार्फत काम सुरू झाले. त्यापैकी विद्युत सबस्टेशन चे बांधकाम पूर्ण झाले आहे. आवश्यक ट्रांसफार्मर व इतर यंत्र सामग्री बसविण्यात आले असून विद्युत सबस्टेशन उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे….परंतु तेलंगाना राज्यातून विद्युत टावर लाईन ने विद्युत पुरवठा जोडणी चे काम (विद्युत टावर लाईन उभारणी चे काम) अति मंद गतीने सुरू असल्याने करोड़ों रुपये खर्च करून बांधण्यात आलेले विद्युत सबस्टेशन अद्याप सुरू करण्यात आले नसून 132kv चे सबस्टेशन बांधकाम पूर्ण होवून देखील शोभेचे विद्युत सबस्टेशन झाले आहे. यामुळे तालुक्यातील नागरिकांना….शेतकर्यांना.. लो व्होल्टेज आणि खंडित वीजपुरवठेचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लो व्होल्टेज मुळे लोकांच्या घरातील पंखे, कुलर्स.. शेतकर्यांच्या शेतीचे मोटर पंप निकामी होवून लोकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे…या महत्पूर्ण कामाकडे संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे सदर काम वर्षानुवर्ष रेंगाळत असून काम कधी पूर्ण होणार व आणखी किती वर्षांनी उद्घाटन होणार असे प्रश्न निर्माण होत आहेत…काल मर्यादेत काम न करणार्या कंत्राटदारावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी.विद्युत टावर लाईन चे बांधकाम जलदगतीने पुर्ण करुन सिरोंचा चे 132kv चे नवीन सबस्टेशन तात्काळ सुरू करण्यात यावे ..सिरोंचा तालुक्यातील विद्युत समस्या तात्काळ दूर करण्यात यावी..अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल..अशी मागणी वजा इशारा सत्यनारायण बुर्रावार शिवसेना माजी उप जिल्हाप्रमुख यांनी दिला आहे..