पंढरपूर:
पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षित गुंतवणूक जागरुकता आणि आर्थिक नियोजनावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे यांनी दिली.
कार्यशाळेसाठी आयोजित प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आर. आर. येळीकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी गुंतवणुकीचे महत्त्व, धोके टाळण्याचे उपाय, आणि बाजारातील नवीन तंत्रज्ञानावर आधारित संधी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विविध सत्रांद्वारे शेअर बाजार, म्युच्युअल फंड, डीमॅट खाते उघडणे, आणि आर्थिक नियोजनाच्या पद्धती याविषयी समर्पकरित्या माहिती देण्यात आली. सहभागी उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि त्यांनी उत्कृष्ठरित्या माहिती सांगीतल्याबद्यल आयोजकांचे आभार मानले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. चेतन पिसे, डॉ. कदम, डॉ. मुलाणी, डॉ. कोंडरु, डॉ. पिंगळे, डॉ. संपत देशमुख, डॉ. गोडबोले, डॉ. अनिल निकम, डॉ. गंधारे, डॉ. आराध्ये, डॉ. पवार, डॉ. कोळी, प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. अनिल निकम, डॉ. दिपक गणमोटे आदिंसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.