पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये बुधवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२४ रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर पृथ्वी अकॅडमीचे मयुर राजमाने यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यानात मयुर राजमाने यांचे स्वागत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
यावेळी मयुर राजमाने यांनी स्पर्धा परीक्षा विषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. स्पर्ध परीक्षेचा अभ्यास कसा करावा, अभ्यास करत असताना राज्यसेवा परीक्षेचे टार्गेट ठेवा. अभ्यास करत असताना सुरुवातीपासून नियमित अभ्यास केल्यास अवघड असे काही नसते. स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करण्यासाठी अनेकांना चार पाच वेळा प्रयत्न करावे लागतात. पहिल्या किंवा दुसर्या प्रयत्नात यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या नगण्य आहे. करिअरचा एक पर्याय म्हणून अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडतात परंतु करिअरच्या वाटेवर नेमके काय करायचे हे माहिती असणे अत्यंत आवश्यक असते. यासाठी स्पर्धा परीक्षेत झालेले बदल व भविष्यात होणारे बदल लक्षात घेऊन नियोजन करून सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास यश निश्चित भेट असते. याशिवाय स्पर्धा परीक्षेची मनात भिती न बाळगता आत्मविश्वासाच्या जोरावर परीक्षा दिली पाहिजे असे मत मयुर राजमाने यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी सुमिञा सांगोलकर हिने केले.