पै.सिकंदर शेख शहाजी केसरी किताबाचा सलग दुसर्यांदा मानकरी!

दै. तुफान क्रांती.
इंदापूर : ( दि.२५ फेब्रुवारी)
  डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या, अतिशय रोमांचकारी व क्षणा-क्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या तुल्यबळ लढतीमध्ये पै. सिकंदर शेख व पै. माऊली कोकाटे हे नीरा भीमा कारखान्याच्या शहाजी केसरी कुस्ती किताबाचे मानकरी ठरले. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पै.सिकंदर शेख व पै.माऊली कोकाटे यांना शहाजी केसरी किताबाची मानाची गदा प्रदान करण्यात आली.
           शहाजीनगर (ता. इंदापूर) येथे रविवारी (दि.२५) निरा भिमा सहकारी साखर कारखान्यावरती लोकनेते कै.शहाजीराव पाटील यांच्या ४५ व्या पुण्यतिथीनिमित्त कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शहाजी केसरी कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रेक्षकांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या शहाजी आखाड्यामध्ये सुमारे पंचवीस हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली. यावेळी शहाजी केसरी किताबासाठी प्रमुख दोन लढती झाल्या. पहिल्या प्रमुख लढतीत पै.सिकंदर शेख ने हिंदकेसरी पै.प्रिन्स कोहली याच्यावर दोन वेळा मोळी पट काढून चित करण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून प्रिन्स कोहली यांनी सुटका करून घेतली. या दरम्यान पै.प्रिन्स कोहलीच्या गुडग्यास इजा पोचल्याने त्याने कुस्ती सोडून दिल्याने पै.सिकंदर शेख यास सलग दुसऱ्या वर्षी शहाजी केसरी किताबासाठी विजयी घोषित करण्यात आले. तर शहाजी केसरी किताबाच्या दुसऱ्या प्रमुख लढतीत पै.माऊली कोकाटे याने महाराष्ट्र केसरी पै.पृथ्वीराज पाटील याच्या वर मात केली.
       तसेच अन्य लढतीमध्ये उपमहाराष्ट्र केसरी पै.महेंद्र गायकवाड ने उपमहाराष्ट्र केसरी पै.प्रकाश बनकर वर मात केली. तर पै. सनी पंजाबीने रोमहर्षक लढतीत पै.सुहास गोडगे वर विजय मिळविला. तसेच पै.मनीष रायते याने पै.विक्रम भोसले याचेवर तुल्यबळ लढतीत मात केली. शहाजी कुस्ती आखाड्यामध्ये डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या सर्वच कुस्त्या रंगतदार झाल्या. अतिशय नियोजन पद्धतीने कुस्तीचे मैदान संपन्न झाले, अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली.
     यावेळी मल्ल सम्राट पै. रावसाहेब मगर, महाराष्ट्र केसरी शिवाजी पाचपुते, महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे, महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर, पै.आप्पासो कदम, पै.मौला शेख, पै.अस्लम काझी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते गोविंद पवार, कुस्ती कोच विश्वास हरगुले,बापूसाहेब कुस्ती संकुलाचे संस्थापक पै.अस्लम मुलाणी  आदीसह राज्यभरातून आलेले मल्ल, इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
     यावेळी बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, कर्मयोगी शंकररावजी पाटील व लोकनेते शहाजीराव पाटील यांनी कुस्तीला नेहमीच प्रोत्साहन दिले. इंदापूर येथे सन २००५ मध्ये आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा उल्लेख हर्षवर्धन पाटील यांनी केला. पै.माऊली कोकाटे च्या रुपाने इंदापूर तालुक्याला महाराष्ट्र केसरी पद मिळावे,अशी अपेक्षा यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.
       शहाजी कुस्ती आखाडा यशस्वीरित्या पार पाडणेसाठी संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, अँड. कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, कमाल जमादार, दत्तात्रय पोळ, तानाजीराव नाईक, राजकुमार जाधव, कार्यकारी संचालक हेमंत माने यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर व अमर निलाखे यांनी केले. आभार कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी मानले.
हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते तीन मल्ल डी वाय एस पी सह मान्यवरांचा सत्कार ! !
या शहाजी कुस्ती आखाड्यांमध्ये तीन डी वाय एस पी  ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै.विजय चौधरी, अर्जुन पुरस्कार विजेते पै.नरसिंह यादव, अर्जुन पुरस्कार विजेते पै.राहुल आवारे यांच्या सह अर्जुन पुरस्कार विजेते गुरुवर्य पै.काका पवार यांचा यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार कारण्यात आला.
तसेच उपरोक्त मान्यवरांनी आपल्या  मनोगतातुन आखाड्याच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
ALSO READ  सणसर येथे शनिवारी तर बावडा येथे रविवारी भाजपचा मेळावा

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000