शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये पालक मेळावा संपन्न

सांगोला दिनांक 17/2/2024
येथील रामकृष्ण टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या शैक्षणिक वर्ष 2023 -24 मधील द्वितीय सत्रातील पालक मेळावा दिनांक 17- 2- 2024 रोजी संपन्न झाला. पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ विश्वस्त श्री. एम. आर. गायकवाड होते तर प्रमुख उपस्थित म्हणून संस्थेचे सचिव श्री. ए. आर गायकवाड होते. प्रारंभी पालक प्रतिनिधी श्री. पोपट खटकाळे व महिला पालक प्रतिनिधी सौ.सारिका पांडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. उपस्थितीत पालक व पालक प्रतिनिधी यांचे स्वागत सचिव श्री. ए. आर. गायकवाड व ज्येष्ठ विश्वस्त श्री. एम. आर. गायकवाड यांच्या हस्ते  करण्यात आला. प्रास्ताविकात  प्राचार्य डॉ. आर. ए.देशमुख यांनी संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबुराव गायकवाड, सचिव श्री. ए.आर.गायकवाड व विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वर्ष 2023 -24 मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले विविध उपक्रम, सराव परीक्षा, रात्र अभ्यासिका, दत्तक पालक योजनेचे कार्य याविषयी सविस्तर माहिती देऊन  महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांनी घेतलेल्या हिवाळी परीक्षा 2023 च्या निकालाचे वाचन केले. पालक प्रतिनिधी श्री. पोपट खटकाळे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना कॉलेजमधील असणारी आदरयुक्त शिस्त, उत्कृष्ट निकालाची परंपरा, देश विदेशातील विविध नामवंत कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची नोकरीसाठी होणारी निवड या गोष्टींचे कौतुक करून दर्जेदार शैक्षणिक सुविधा, शिक्षणाचा उत्तम दर्जा तसेच विद्यार्थ्यावर होणारे चांगले संस्कार ही शिवाजी पॉलिटेक्निकची खरी ओळख असल्याचे मत व्यक्त केले. महिला पालक प्रतिनिधी सौ. सारिका पांडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपला पाल्य या संस्थेत शिकून कशाप्रकारे उत्तम करिअर करीत आहे याविषयी उपस्थित पालकांना त्यांनी माहिती दिली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की विद्यार्थी या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकत असताना उत्तम संस्काराची शिदोरी, कठोर मेहनत, शिस्त, प्रयत्नवादी बनून भविष्यासाठी उत्तम नागरिक म्हणून तयार होतात. यावेळी श्री. संजय पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई आयोजित ‘सी’झोन विभागीय क्रीडा स्पर्धेत कबड्डी, बास्केटबॉल, खो-खो या सांघिक तसेच उंच उडी, रनिंग, भालाफेक, कुस्ती, वेटलिफ्टिंग इत्यादी वैयक्तिक क्रीडा प्रकारात विजेते व उपविजेतेपद मिळविणाऱ्या खेळाडूंचा यावेळी पालक प्रतिनिधी व संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना संस्थेचे जेष्ठ विश्वस्त श्री. एम.आर. गायकवाड  यांनी उपस्थित पालकांनी केलेल्या सूचनांची दखल घेऊन त्या सूचनांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था व कॉलेज कटिबद्ध असून येणाऱ्या काळात देखील या संस्थेतील विद्यार्थी उज्वल यश संपादन करून उत्तम करिअर करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी उपस्थित पालकांनी पालक मेळाव्यानंतर आपल्या पाल्याच्या दत्तक-पालक शिक्षकाची भेट घेऊन त्यांची प्रगती जाणून घेतली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. पी. सी.चव्हाण यांनी केले.

ALSO READ  येवल्यातील शिवसेना-ठाकरे गटाला धक्का, माजी आमदार कल्याणराव पाटील यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000