कोळा वार्ताहर:
सांगोला तालुक्यातील कोळे शिवेचीवस्ती येथील अंगणवाडी मध्ये कोणत्याही प्रकारची स्थानिकांना माहिती न देता पेपर मध्ये जाहिरात न देता स्थानिक ग्रामस्थांना डावलून मदनीसची जागा भरली गेल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने संताप व्यक्त करून अंगणवाडी शाळेला कुलूप ठोकून निषेध व्यक्त केला आहे तातडीने भरण्यात आलेली जागा तातडीने रद्द करावी अशी मागणी निवेदन पंचायत समिती सांगोला तहसीलदार सांगोला शिक्षणाधिकारी सांगोला बाल विकास अंगणवाडी सांगोला यांच्यावतीने निवेदन शिवेचीवस्ती ग्रामस्थांच्या वतीने दादा आप्पाण्णा कोळेकर यांनी दिले अशी माहिती दिली आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कोळा २ ता. सांगोला अंतर्गत सर्व गावांची मदतनीस पदामाती जाहिरात दि. २३/०२/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे परंतु कोंबडवादी शिवेचोवस्ती येथील अंगणवाडीची जाहिरात प्रसिध्द न करता आपल्या विभागामार्फत सदरच्या कोंबडवाडी शिवेचीयम्ती ता. सांगोला येथील अंगणवाडी साठी मदतनीस पदाची जागा आपल्या विभागामार्फत भरलेली आहे. शिवेचीवस्ती येथील पदाची जाहिरात प्रसिध्द न करता बाल विकास सेवा योजना प्रकल्प कोळा २ ता. सांगोला अंतर्गत सर्व गावांची मदतनीस पदाची अनं स्विकारण्याची अंतिम मुदत हि दि. ०७/०३/२०२४ पर्यंत व निवड यादी प्रसिध्द दि. २६ एप्रिल २०२४ असताना आपण सदर पदाची नेमणुक मुदतीच्या अगोदरच का व कशाचा आधारे केली याचा खुलासा मिळावा, तसेच शिवेचीवस्ती येथील अंगणवाडी मदतनिस पदाची जाहीरात का प्रसिध्द केली नाही याचाही खुलास मिळावा, शिवचीवस्ती येथील अंगणवाडी इमारतीसाठी जागा वस्तीवरील दादा आप्पाण्णा कोळेकर यांनी दिली असल्याने मदतनिस या पदासाठी प्रामुख्याने त्यांची पत्नी सौ. वंदना दादा कोळेकर यांच्या नावाचा विचार होणे गरजेचे होते त्यांचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले असुन इयत्ता १२ वी ला त्यांना ५६ टक्के मार्क आहेत. परंतु आपल्या विभागामार्फत असे काहीही झाले नाही त्यामुळे जोपर्यंत शिषेचीवस्तो येथील मदतनिस पद भरती नियमानुसार होत नाही तोपर्यंत दि. ०२ मार्च २०२४ पासून आम्ही ग्रामस्थांच्यावतीने अंगणवाडीला कुलूप ठोकून शाळा बंद केली आहे जोपर्यंत नियमानुसार भरती केली जात नाही तोपर्यंत अंगणवाडी बंद राहील असे दादा कोळेकर यांनी सांगितले.