रेशनचे धान्य लाटणाऱ्या नोकरदारांवर कारवाई करण्याचे पुरवठा विभागाला आदेश :तहसीलदार संतोष कणसे

 सांगोला प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासन पुरवठा विभागाकडून अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील 15किलो गहू व 20किलो तांदुळ व अन्नसुरक्षा योजना केसरी कार्ड साठी प्रती मानसी 2कीलो गहू 3किलो तांदुळ काही प्रमाणात केसरी शिधापत्रिकाधारकांना या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्ती पाच किलो मोफत धान्य दिले जाते. ही योजना गरिबांसाठी असताना सांगोला शहर व तालुक्यातील 170ची नावे या योजनेत समाविष्ट असल्याचे पुरवठा अधिकारी नितीन जाधव व पुरवठा निरीक्षक सौ दराडे मॅडम यांनी व गरजूंना या योजनेचा लाभ मिळत नसल्याची माहिती पुरवठा विभाग व तहसीलदार श्री संतोष कणसे यांना दिली आहे.
 या  योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या नोकरदारांकडून शासन बाजारभावाप्रमाणे रेशन धान्याचे वसूल करणार असून त्याप्रमाणे नोटीस बजावण्याचे काम चालू करण्यात आले आहे. संबंध 170 नोकरदारांवर योग्य ती कडक कारवाई केली जाईल व पिवळ्या शिधापत्रिका धारकांची सखोल तपासणी करणार असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. पुरवठा विभागाकडून रेशन कार्ड आधार कार्ड व मोबाईल क्रमांक एकमेकांशी लिंक होण्याने अनेक शासकीय कर्मचारी या योजनेत समाविष्ट असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांना दिसून आले आहे त्याची माहिती जिल्हाधिकार्यालय व तहसील कार्यालय यांना दिली असून पुरवठा विभाग या कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना नोटीस बजावून त्यांना एकत्रित कुटुंबतील असल्यास विभक्त करून घेणे रेशनचा लाभ सोडणे असे पर्याय दिले होते  परंतुव तसे न झाल्याने आतापर्यंत उचललेल्या धान्याची बाजारभावानुसार रक्कम वसूल केली जाईल अशी माहिती तहसीलदार संतोष कनसे यांनी दिली आहे पुढे या बहाद्दर यांना संधी मिळणार की कारवाई की वसुली होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागुन राहिले आहे.
ALSO READ  दिंडी चालली पंढरीला...!  

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000