सांगोला:
ता. 11-
सांगोला तालुका काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सोबत पार पडली.
यावेळी सांगोला तालुका येथे झालेल्या काँग्रेसच्या बैठकीचा आढावा सादर केला. आगामी होणारी 2024 ची विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष म्हणून काँग्रेसला मिळावी अशा प्रतीचे निवेदन सादर करण्यात आले.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस ठरला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे जनतेत काँग्रेस विषयी विश्वासाचे वातावरण निर्मिती झाली असून ग्रामीण भागातील युवक,महिला, शेतकरी वर्गात काँग्रेस पक्षावरती विश्वास वाढला असून आगामी विधानसभेमध्ये ही जागा काँग्रेसला देण्यात यावी असा ठराव सांगोला काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विभाग सहकार उपाध्यक्ष अजयसिंह इंगवले पाटील,कार्याध्यक्ष सुनील नागणे, शेखलाल शेख, रणजित महापुरे,अमर तांबोळी,विजय काटे, आनंदराव काटे,मयूर महामुनी,सिद्धेश्वर देशमुख आधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.