सांगोला:
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तम संघटनात्मक बांधणी करत, विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजपतर्फे गाव चलो अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सुमारे ५ हजार भाजप कार्यकर्त्यांनी सांगोल्यात व्यापक जनसंपर्कासाठी गाव चलो अभियान राबविण्यात आले असून राज्यातील सर्वात मोठे अभियान सांगोल्यात राबविण्यात आले असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी दिली.
यावेळी बोलताना चेतनसिंह केदार सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने विविध क्षेत्रात दमदार कामगिरी केली. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हीच मोदींची गॅरंटी असल्याने आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. त्यात गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील महायुती सरकारनेही महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले आहे आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना शहरातील प्रत्येक बूथवरील लाभार्थीपर्यंत पोचविण्यासाठी गाव चलो अभियान हाती घेण्यात आले आहे. राज्यातील सर्वात मोठे गाव चलो अभियान सांगोला तालुक्यात राबविण्यात आले आहे. या अभियानात जिल्ह्यातील सुमारे ५ हजार भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. या दरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाच हजार ठिकाणी दिवार लेखन करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.