सांगोला प्रतिनिधी:
अवकाळी पावसाने सांगोला तालुका चालू असून वादळी वाऱ्यातून काल एकाच दिवशी डोंगरगाव येथे श्रीपती नाना राजगे यांचे घराचे पत्रे उचकटून उडून गेले अशोक आबा फोंडे यांचे राहते घराचे पत्रे उचकटून उडून गेले अशोक आबा फोंडे यांचे राहते घराचे पत्रे व गृह उपयोगी साहित्य यांचे नुकसान झाले भगवान महादेव फोंडे यांचे घराचे पत्रे व कवले जनावरांचे पत्रा शेड उचकटून उडून गेले तुकाराम पांडुरंग फोंडे यांचे घरावरील पत्रे उचकटून नुकसान झाले श्रीमती चिंगुबाई शामराव देवकते यांचे घरावरील पत्रे उचकटून निघाल्याने घरातील सर्व गृह उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले श्री आबा दिनकर विठोबा कोडक यांचे सिमेंट बांधकाम असलेल्या खोल्यांवरील पत्रे व गृह उपयोगी साहित्य उडून गेले त्याचबरोबर अंकुश आबा लवटे यांचे घरावरील पत्रे उडून घराची पडझड व जनावरे दुखापतग्रस्त झाली तर मौजे मानेगाव येथे दत्तात्रेय महादेव बाबर यांच्या घरावर जवळ झाड फोडून महेश मयत झाली कडलास येथे सुभाष दामोदर यांचे विज पडून शेळी दगावली आहे. त्याचबरोबर कोळा येथे विविध ठिकाणी पत्रे उडून नुकसान झाल्याच्या घटना आहेत.
त्याचबरोबर जुजारपूर येथे बुधवार रोजी दगडू खडके यांच्या घरावरील पत्रे घरातील गृह उपयोगी साहित्याचे खूपच नुकसान झाल्याने सांगोला तहसीलदार श्री संतोष कणसे यांनी बऱ्याच ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पडझडीची पाहणी केली नागरिकांना दिलासा देण्याचे काम करत त्यांचे सांत्वन करून शासनाकडून होईल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून नुकसानग्रस्त नागरिकांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा असेही सांगितले.