गुन्हयात वापरलेला गावठी कटटा व गुन्हयात वापरलेली चारचाकी गाडी हस्तगत करून उल्लेखनीय कामगीरी केली
दिनांक ०१/०२/२०२४ रोजी सकाळी ०९/०० वा. ते दिनांक ०२/०२/२०२४ रोजीचे सकाळी १०/०० वा.चे पुर्वी यातील फिर्यादी यांचा भाउ दादासो बोडरे यांनी दिलेली तकार मागे घेणेकरीता यातील फिर्यादी यांना यातील आरोपी अ. नं. १) विक्रम उर्फ पप्पु आण्णासो सावत व आरोपी अ. नं. २) नितीन सावत दोघे रा. खवासपुर ता. सांगोला जि. सोलापुर यांनी फोनवरून शिवीगाळी करून धमकावले आहे. तसेच यातील फिर्यादी यांचे मौजे खवासपुर येथील राहते घराजवळ चारचाकी गाडीत त्याचे साथीदारसह येवुन यातील फिर्यादी यांचेकडे रागाने बघुन त्यांनी आणलेल्या गाडीतुन जात असताना त्यांचेकडे असलेल्या गावठी कटटयाने हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणा-या वरील दोन गुन्हेगार यांचेवरती सांगोला पोलीस ठाणेस गु. र. नं. १०६/२०२४ भा. द. वि. कलम ५०४, ५०७, ३४ सह आर्म अॅक्ट ३, २५, २७ अन्वये नोंद करण्यात आला आहे.
मा पोलीस अधिक्षक सो सोलापुर ग्रा.. श्री. शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधिक्षक सो सोलापुर ग्रा. श्री प्रितम यावलकर यांनी गावठी कटटयाने गोळीबार करून दहशत माजविणा-या सदर गुन्हेगारांचा शोध घेणेकरीता एक तपास पथक तयार करून नमुद गुन्हेगारांची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे सदर गुन्हयाचे तपास अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक पी. एस. मोरे व पथकाने गोपनिय माहिती काढुन सदर गुन्हयातील पाहिजे असलेले आरोपी अ. नं. १) विक्रम उर्फ पप्पु आण्णासो सावत व आरोपी अ. नं. २) नितीन सावत दोघे रा. खवासपुर ता. सांगोला जि. सोलापुर यांचा शोध घेतला असता त्यातील आरोपी क्रमांक १) विक्रम उर्फ पप्पु दादासो सावंत, वय. २७ वर्षे, रा. खवासपुर ता. सांगोला जि. सोलापुर हा मिळुन आल्याने यास अटक करून त्याचेकडुन गुन्हयात वारलेला गावठी कटटा, गावठी कटयातुन गोळीबार केला खाली केस व गुन्हेगारांनी गुन्हयात वापरलेली पांढ-या रंगाची हयुडाई कंपनीची केटा चारचाकी गाडी नं. एम. एच. १२.पी.एन. २००० ही जप्त करण्यात आली आहे. सदरची कामगिरी ही मा. श्री. विक्रमसिंह गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी साो., मंगळवेढा विभाग मंगळवेढा व पोलीस निरीक्षक सो., मा. श्री. भिमराव खणदाळे सो., सांगोला पोलीस ठाणे यांचे मागदर्शनाखाली गुन्हेचे तपासी पथकातील सपोनि पवन मोरे, पोहवा / २६४ क्षीरसागर, पोहेकॉ/१०१९ झोळ, पोना/५४६ पकाले, पोना/१२२८ जाधव व पोकॉ/३३५ वाघमोडे यांनी सदरची कामगिरी केली आहे.