सांगोला प्रतिनिधी:
सांगोला शहरातील मोकाट जनावरे हा विषय बरेच दिवसापासून चर्चिला जात होता.काही दिवसापूर्वी माझी नगरसेवक यांचा मृत्यु या मोकाट जनावरे मुळे झाल्याचे आढळून आले होते, त्यापूर्वी बरेच नागरिकांना हॉस्पिटलाईज व्हावे लागले आहे. परंतु कारवाई होत नव्हती. मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांनी अगोदर कोंडवाडा, आपले प्रयत्न करुन त्यासाठी आवश्यक असते असे वाहन सांगोला शहरातील मोकाट जनावरे पकडण्यासाठी मा.मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी विशेष प्रयत्न करुन पंढरपुर नगरपरिषदेकडून वाहन उपलब्ध केले आहेे. सांगोला शहरातील विविध स्तरातून नागरिकांनी मा.मुख्याधिकारी यांच्या प्रसंगावधानाचे तसेच सदर कार्याचे कौतुक केले आहे. मोकाट जनावरे पकडण्यासाठी मुख्याधिकारी यांनी केलेल्या तातडीच्या प्रयत्नाचे व कार्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.