व्हनाळी – सागर लोहार
श्री भैरवनाथ देवालय कमिटी (डिलाई रोड) मुंबई येथे स्थापित असलेल्या श्री भैरवनाथ देवालय मुर्तींचा साके ता.कागल येथे आगमण सोहळा व मिरवणूक कार्यक्रम रविवार दि.4 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता परमाब्धिकार प.पु.परमात्मराज राजीवजी महाराज (आडी) यांचे हस्ते होणार आहे.
यावेळी भैरवनाथ मुर्तींची सजवलेल्या पालखीतून भव्य मिरवणूक सोहळा आयोजित केला आहे. त्यानंतर भैरवनाथ देवालय येथे विधिवत पुजन करून सकाळी 11.00 ते दु.2.00 पर्यंत भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले असून या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
फोटो ओळी- श्री भैरवनाथ देवालय साके