तुफान क्रांती/दौंड :
कडेठाण येथे विविध विकास कामांसाठी १ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या विकास कामांच्या भूमी पूजनाचा कार्यक्रम माजी आमदार रमेश थोरात यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित करण्यात आला होता. यावेळी खरेदी विक्री संघांचे माजी अध्यक्ष लक्ष्मण दिवेकर, सरपंच सोनाली नारळे,उपसरपंच अनिल धावडे, शैला दिवेकर, चेअरमन प्रशांत दिवेकर, दादा इंगळे, संतोष दिवेकर, संजय रणधीर, स्वप्नील भोसले,विठ्ठल दिवेकर,जनार्दन कुंजीर व ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रमेश थोरात यांनी दै.तुफान क्रांतीशी बोलताना म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणूक ही जनतेच्या व मतदारांच्या आग्रहापोटी लढणार असल्याचे सांगितले. दौंड तालुक्यातील सर्वसामान्य जानेतेच्या समस्या सोडवण्याठी मी कधीही राजकारण न करता कामे केली असून त्याची अनेक उदाहरणे सामान्य जनतेला माहिती आहेत. त्यामुळे ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढणार असून तुतारी चिन्ह मिळाले तर तुतारी नाही तर अपक्ष लढणारच असल्याची माहिती दिली.