जे होऊ नये ते सांगलीकरांच्या मुळावर घाला येत आहे सांगलीच्या अर्थव्यवस्थेचा खेळ करणाऱ्या व दहा वर्षे पाठीमागे नेणाऱ्या मानवनिर्मित अलमट्टीच्या बॅकफूट वाटर मुळे सांगलीकरांना पूरग्रस्त यातना भोगाव लागत आहेत. स्वतः राहत असल्याच्या घरातून पूरग्रस्ता नागरिक बे दखल होऊ लागले आहे,घर पाण्याने अंघोळ करीत आहे राहिलेला संसार,कुत्री, मांजर, कोंबड्या व जनावर घेऊन स्थलांतर करण्याची वेळ येत आहे. एक नाहीतर तीन तीन,चार चार वेळा ही परिस्थिती सांगली करावर येऊ लागले आहे अशा परिस्थितीत एक सामाजिक कार्य म्हणून आम्ही पूरग्रस्त नागरिकांसाठी स्वर्गीय खासदार डी जी पाटील इस्टेट,दक्षिण शिवाजीनगर चांदणी चौक, सांगली या ठिकाणी मोफत राहण्याची,जेवणाची व नाश्त्याची व्यवस्था केली आहे तरी पूरग्रस्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये दिली.