हफ्ते द्या, अवेध धंदे चालवा ?
नवीन रूजू झालेले पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल साहेब अवैध धंद्याया कडे लक्ष द्या
आओ चोरो बाधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा
परतुर – इम्रान कुरेशी
परतूर शहरात गेल्या दोन वर्षापासून अवैध धंदे बंद होते.कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक श्यामसुंदर कौठाळे व मच्छिंद्र सुरवसे यांनी शहरात व तालुक्यात मटका हद्दपार केला होता.दरम्यान मटकामाफियांनी नविन शक्कल लढवत मोबाईल मटका सुरू करून स्वता:च्या घराला बुक्कीचा अड्डा बनवला आहे.परंतु यावर कारवाई करण्यासाठी पोलीसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे.
मात्र मटका अड्डे आता नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेत वाढले आहेत. मोबाइलवरून बुकिंग घेण्यासह मटक्याची रक्कम थेट संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्याचीही पद्धत वापरली जात आहे. तालुक्यात वाटूर येथे ध… जा.. ? व तसेच परतुर शहरात मलंगशहा चौक,भाजीमंडई,होलाणी दालमिल,रेल्वे स्टेशन परिसर,साईबाबा चौक,अशा भरवस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी खुलेआम मटका अड्डे सुरू आहेत. जालना व सेलू सहकाऱ्यासह जुने मटका किंग पुन्हा सक्रिय झाले आहेत, त्यामुळे मटका अड्ड्यांना पोलिसांकडून अभय मिळत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
शहरातील अनेक परिसर हा दोन नंबर धंद्यांमधील जुना अड्डा समजला जातो. गजबजलेल्या लोकवस्तीचे कार्यक्षेत्र असलेल्या परतुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका आणि जुगार खेळणाऱ्यांनी नवीन ठिकाणे तयार केली आहेत. पारंपरिक पद्धतीने ठराविक पानटपऱ्या,हॉटेल,अंडापावचे गाड्यावर तसेच घरात बसुन व रस्त्यावर फिरताना मटक्याचे बुकिंग घेणे सुरू आहेच, पण आता मोबाइल मटकाही सुरू आहे. मोबाइलवरून मटक्याचे आकडे लावण्याची सुविधा बुकींनी सुरू केली आहे. यासाठी मटका खेळणाऱ्या नेहमीच्या ग्राहकांना ठराविक मोबाइल नंबर पुरवले जातात. हे नंबर ठराविक दिवसांनी बदलतात. मटका लागलेल्या व्यक्तीला मोबाइलवरूनच माहिती पुरवली जाते. विशेष म्हणजे मोठ्या रकमेसह खेळणाऱ्यांना बँकिंग सुविधाही पुरवली जात आहे. मटका खेळणाऱ्यांना रक्कम घेण्यासाठी जावे लागू नये, यासाठी बुकीकडे असलेल्या कार्यकर्त्यांच्या खात्यावरून मटक्याची रक्कम खेळणाऱ्यांच्या नावावर ऑनलाइन वर्ग केली जाते. या प्रकारामुळे लोकांच्या नजरेत न येताही मटका खेळता येत असल्याने तरुण आणि पांढरपेशा वर्गही मटक्याकडे आकर्षित होत आहे.यासाठी एजंटकडुन सदरील रकमेची वसुली करण्यासाठी एका पंटराची नेमणुक केली आहे.मटकेवाल्यांना पोलिसांचेच अभय मिळत असल्याने भरवस्तीतही अड्डे सुरू आहेत.
सकाळी आणि संध्याकाळी मटका घेण्याच्या ठराविक वेळेत चौकांमध्येच हे एजंट उभी असतात. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे जुने मटका किंगही नव्याने सक्रीय झाले आहेत, यामुळे परतुर शहरात मटक्याची उलाढल लाखोंच्या घरात पोहोचली आहे.
पोलिसांचे दुर्लक्ष की अभय?
राजरोसपणे सुरू असलेले मटका अड्डे पोलिसांना माहीत नसावेत हे आश्चर्यकारक आहे. परतुर पोलिस ठाण्याच्या आसपास फेरी मारल्यानंतरही मटका अड्ड्यांचे वास्तव लक्षात येते. कचऱ्याचे ढीग तपासले तरीही मटक्याच्या पाटीभर चिठ्ठ्या मिळतात. आत्मविशावास दुणावलेले बुकी उघडपणे अड्डे सुरू करीत आहेत. यानंतरही पोलिसांच्या कारवाया केवळ कागदोपत्री होत राहतात हे विशेष.