आगामी विधानसभा निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी सोलापूर ग्रामीण व सांगली जिल्हयातील पोलीस अधिकाऱ्यांची जिल्हा बॉर्डर मिटीग

सोलापूर:

आगामी विधानसभा निवडणूक २०२४ ही शांततेत, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी व निवडणुक कार्यकाळात गुन्हे करणाऱ्या गुन्हे गारांचा बंदोबस्त करण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस व सांगली जिल्हा पोलीस यांची संयुक्त बैठक शुक्रवार दिनांक १८/१०/२०२४ रोजी १२:०० वा. ते १५:०० वाजता सिंहगड इन्स्टीट्युट, कमलापूर येथे पार पडली.
सदर बैठकीमध्ये सोलापूर व सांगली सीमाभागातील सराईत गुन्हेगार, पाहिजे व फरारी असलेले आरोपी यांना अटक करणे. अवैध व्यवसाय करणारे आरोपी दारु, गांजाची वाहतुक करणारे आरोपी व विक्री करणारे आरोपी यांच्यावर कारवाई करणे. तसेच पोलीस ठाणे हद्दीतील सराईत आरोपी, गुंड प्रवृत्तीच्या इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आले. सर्वांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या. तसेच निवडणुक भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस व जनता यांच्यातील समन्वय वाढवून कम्युनीटी पोलीसींग वर भर देण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.
सदरची मिटींग मा.श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, मा. श्री. प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मिटींग करीता श्री. विक्रांत गायकवाड, उपविपोअ मंगळवेढा, श्री. सुनिल साळुंखे, उपविपोअ जत विभाग, श्री. विपुल पाटील, उपविपोअ विटा विभाग, श्री. महेश ढवाण, पोनि मंगळवेढा, श्री. ज्योतीराम पाटील, पोनि कवठे महंकाळ, श्री. बिजली, पोनि. जत, श्री. संदीप कांबळे, सपोनि उमदी, जि. सांगली, श्री. रमेश जाधव, सपोनि आटपाडी, श्री. सचिन जगताप, सपोनि सांगोला, श्री. विनायक माहुरकर, पोउपनि सांगोला हे हजर होते.

ALSO READ  मुरगूडमध्ये विविध उपक्रमांनी विश्वकर्मा जयंती साजरी !

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000