महायुतीची पदयात्रा म्हणजे खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांच्या विजयाचा जयघोष
सांगोला/ प्रतिनिधी:
43 माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सांगोला शहरात पदयात्रा काढण्यात आली. महायुतीमध्ये भाजप ,शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , राष्ट्रीय समाज पक्ष ,आरपीआय (आठवले गट ), रयत क्रांती संघटना, मनसे, व इतर घटक पक्षांचा समावेश आहे. ही पदयात्रा रविवार दि 5 मे रोजी सकाळी 9.15 वाजता सांगोला शहरातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला. शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले व या पदयात्रेचा समारोप महात्मा फुले चौक येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. शहरातील मेन रोड, नगरपालिका व पुढे महात्मा फुले चौक असे मार्गक्रमण करीत महात्मा फुले चौक येथे महायुतीचे उमेदवार खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांच्या विजयाच्या घोषणा देत सांगोला तालुक्यातील महायुतीचै नेते मंडळी ,सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक, यांनी, पदयात्रेत सहभाग नोंदवला . सांगोला शहरातील या , पदयात्रा प्रचार दौऱ्यात संग्रामसिंह जाधवराव ,माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने , मा.गटनेते तथा नगरसेवक आनंदाभाऊ माने, ,मा,नगरसेविका छायाताई मेटकरी, मा.नगरसेवक माऊली तेली, मा.नगराध्यक्ष नवनाथभाऊ, उद्योगपती आनंद घोंगडे, मा . नगरसेवक अस्मिर तांबोळी, मा. नगरसेवक व, भाजपचे कार्यकारणी सदस्य ॲड.गजानन भाकरे ,मा. नगरसेवक माऊली तेली ,मा नगरसेवक सोमेश यावलकर ,भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत सुपेकर, भाजपचे तालुका चिटणीस डॉ. मानस कमलापुरकर ,भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण जानकर ,भाजप शहराध्यक्ष अनिता बेले, चेअरमन लतिका मोटे, भाजपचे नेते आनंद फाटे, मेजर आनंदा व्हटे ,भाजपच्या नेत्या शितल लादे,,युवा नेते काशिलिंग गाडेकर ,मायाका प्रतिष्ठानचे अध्यक्ष काशिलिंग गावडे, अरुण पाटील, कीर्तीपाल बनसोडे, सूर्यकांत मेटकरी, समाधान नरुटे सागर नरुटे ,काकासाहेब लेंगरे, विशाल वाघ ,सोमनाथ ठोकळे , राहुल दिवटे ,सुनील पवार, शिवाजी गावडे, जय बनसोडे, ऋषी जानकर, समीर पाटील, अनुराधा माने, सुवर्णा जाधव ,अश्विनी दोलतडे,सुवर्णा गडदे, करिश्मा मुजावर, ललिता खाडे , फर्जाना मुजावर, अरुणा माने, रुकसाना मुजावर, शोभा जाधव, मनीषा दहिवडकर ,यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.