आमदारांनी घेतल्या शपथा; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा दुजोरा;अजितदादांना सोडून जाणार नाही!

गडब:

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोडून अन्यत्र कुठेही जाणार नाही अशा शपथा अजित पवार गटाच्या आमदारांनी घेतल्या आहेत. याबाबत अजित पवार गटाचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना दुजोरा दिला. शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीच्या लढतीत 8 जागा जिंकल्या असताना अजित पवार गटाची कामगिरी सुमार राहिली आहे. दरम्यान, येत्या तीन चार महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होणार असल्याने त्यामुळे अजितदादा गटाच्या आमदारांना टेन्शन आले आहे. हे आमदार पक्ष सोडून जाण्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. अजित पवार गटातील १९ आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे काल अजितदादा गटाच्या बैठकीत आमदारांनी शपथा घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. आम्ही अजितदादांना सोडून कुठेच जाणार नाही, अशी शपथच या आमदारांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे.
पराभव झाला असला तरी सोडून जाणार नाही अजितदादा गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनीही या शिक्कामोर्तब केले आहे. शुक्रवारी आमदारांची बैठक झाली. या बैठकीत सर्वच आमदारांनी शपथ घेतली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तरी अजितदादांना सोडणार नाही, अशी शपथ या आमदारांनी घेतल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच शरद पवार गटाचे नवीन मालक रोहित पवार यांनी आमच्या आमदारांना शरद पवार गटात येण्याचे आमंत्रण दिले असले तरी त्याला कोणीही प्रतिसाद देणार नाही, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

ALSO READ  शिरूरमध्ये शिवसेना-ठाकरेंना मोठा धक्का, ज्ञानेश्वर (माऊली) आबा कटके यांनी आपल्या समर्थकांसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000