सांगोला तालक्यातील प्रलंबीत प्रश्नांसंदर्भात आ. डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी घेतली मंत्री शिवेंद्रराजे भोसले‌ यांची भेट

सांगोला:
सांगोल्याचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मुंबई येथे राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले‌ यांची सदिच्छा भेट घेतली.ना.शिवेंद्रराजे भोसले‌ यांनी सांगोला विधानसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा सन्मान करत विजयाबद्दल अभिनंदन केले. स्व. भाई आमदार गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
सांगोला तालुक्यातील प्रलंबीत जे काही प्रश्न आहेत. ते मी राज्य सरकारच्या माध्यमातून एक लोकप्रतिनिधी या नात्याने प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी जातीने लक्ष घालणार आहे. यापुढील काळात सांगोला विधानसभा मतदारसंघातील कामासाठी माझी नेहमी मदत राहील अशी ग्वाही सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.शिवेंद्रराजे भोसले‌ यांनी दिली.
ना. शिवेंद्रराजे भोसले‌ यांना भेटल्यानंतर आपणास खूप आनंद झाला. त्यांची नेहमीच आपुलकीची भावना राहिली असून त्यांचे आशीर्वाद नेहमीच आपल्याबरोबर राहतील.भेटी दरम्यान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी
सांगोला तालुक्यातील अनेक प्रलंबित विकास कामासंदर्भात सविस्तर चर्चा केली.त्यासाठी ना.शिवेंद्रराजे भोसले‌ यांचेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.

ALSO READ  सोलापूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 'उमंग २ के २०२४' चा जल्लोषात समारोप

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000