मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु विधानसभेच्या 288 जागा लढवणार
अंतरवाली सराटी-
पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारपासून उपोषणाचा चौथा टप्पा सुरू केला आहे. “राजकारण माझा धर्म नाही मात्र मागण्या मंजूर न झाल्यास सर्वधर्मीय समाजबांधवांना सोबत घेऊन विधानसभेच्या २८८ जागेवर उमेदवार उभे करणार,” असा इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी दिला. मनोज जरांगे हे चार जून पासून उपोषण करणार होते. परंतु आचारसंहिता, निवडणूक निकाल, ग्रामस्थांचे निवेदने मनोज जरांगे हे चार जून रोजी उपोषण या कारणाने पोलिसांनी जरांगे यांना परवानगी नाकारली होती. तसेच शनिवारी देखील पोलिसांनी परवानगी नाकारली होती, तरीही उपोषण सुरू केले आहे. यावेळी मनोज जरांगे म्हणाले, “मी आरक्षणासाठी आठ महिन्यांपासून आंदोलन, उपोषण करत आहे. सरकारने सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी.
दाखल गुन्हे मागे घ्यावेत. विविध संस्थांचे गॅझेट स्वीकारणे आदी मागण्यांसाठी उपोषणाला बसलो आहे. शासनाने आरक्षण मंजूर करावे. राजकारण माझा धर्म नाही मात्र मागण्या मंजूर न झाल्यास सर्वधार्मिय समाज बांधवाना सोबत घेऊन विधानसभेच्या 288 जागेवर उमेदवार उभे करणार उपोषण सुरू आहे तोपर्यंत सरकारने चर्चेसाठी यावे चर्चेची दारे उघडी आहेत सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे मराठा समाजाचा रोज पत्करू नये दरम्यान अंतरवाली सराटी येथे ग्रामपंचायतीने बैठक घेऊन काही ठराव मंजूर केले. या जरांगेच्या उपोषणाला सहा सदस्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. तथापि उपोषण स्थळी अंबडचे प्रभारी तहसीलदार धनश्री भालचिम उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे आशिष खांडेकर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी भेट दिली तर काल रात्री खासदार बंडू जाधव यांनी भेट दिली. प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.