सांगोला:
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नियोजित माणभुमी महिला को. ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि.सांगोला यांचे वतीने महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.या वेळी उपस्थित सर्व संचालक आणि सभासद यांचे स्वागत ॲड. सौ.सोनिया गिराम यांनी केले. या वेळी संस्थेच्या सदस्या सौ तेजश्री विधीन कांबळे यांनी सांगितले की ,
एकमेकांना सहकार्य करून,एकमेकींच्या अडचणीतून वाट काढून सर्व महिलांना सहकार्य करून संस्थेची सुरुवात सर्वांच्या सहकार्याने करीत आहोत .त्याच बरोबर संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. या वेळी माणभूमी संस्थेच्या सर्व संचालकांची ओळख सौ.अर्चना सरगर यांनी केली.
या वेळी सर्व उपस्थित सभासद महिलांचा गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला. नियोजित माणभुमी महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. सांगोला या संस्थे च्या कार्यालया चे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा सौ. आर्जुमंदबानू आयुब पटेल व सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते फित कापून करणेत आले. संस्थेच्या मुख्य प्रवर्तक आणि अध्यक्षा सौ.पटेल यांनी महिला उद्योजक घडावे , त्यांना आर्थिक बाजूने स्वतःच्या पायावर उभे करणे हे या संस्थेचा मुख्य उद्देश असुन महिला सक्षम तर कुटुंब सक्षम होते असे सांगीतले. एक महिला सक्षम झाल्यास सर्व कुटुंबाची आर्थिक सामाजिक आणि राजकीय स्थैर्य ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.या नंतर
ॲड सौ.अश्विनी बिपीन मोहिते यांनी सर्व संचालक आणि उपस्थित सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि कमीत कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देणे,महिला बचत गट आणि पतसंस्थेच्या माध्यमातून खाजगी सावकारी च्या माध्यमातून होणारी महिलेची आणि त्यांच्या कुटूबियांची पिळवणूक होणार नाही याची सर्वोतोपरी काळजी या संस्थेच्या माध्यमातून घेण्यात येईल . महिला विषयक जे कायदे आहेत ते सर्व माणभूमीच्या माध्यमातून सर्वांना अवगत करून देणे.वेळी कर्ज घेणे आणि व्याजाची परतफेड करणे हे महत्वाचे आहे.पतसंस्था या कायद्याने स्थापन झालेल्या असतात.एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ ह्या युक्तीने काम करावे.माणभुमी हा एका परिवार आहे.एक महिला जर घर व्यवस्थित चालवू शकत असेल तर स्वतःच्या बँकेचे व्यवहार व्यवस्थित पार पाडू शकेल या मध्ये कोणतीही शंका नाही.
या वेळी संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. सौ. आसमा सैफुनहसन तांबोळी यांनी परिवारचे महत्व आणि पैश्याचे योग्य नियोजन या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी चेअरमन सौ. आरजूमंदबानु पटेल यांनी आपले विचार व्यक्त केले. आपल्या सर्वांचे सहकार्याने संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होईल असे सांगितले. यावेळी ॲड.अयुब पटेल यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान शिंदे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करणेकरीता सर्व संचालक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास उत्स्पुर्त प्रतीसाद मिळाला.