अनमोल ज्यांची वाणी
प्रभावी विचारांची लेखणी
लोकशाहीर म्हणून किर्ती
इतिहासाच्या पानोपानी
फक्त दीड दिवसाची शाळा शिकून छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे एकमेव साहित्यरत्न, साहित्य सम्राट लोकशाहीर म्हणजेच अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यात अनमोल स्थान आहे.कथा कादंबरी, प्रवासवर्णने पोवाडे असे अनेक प्रकारचे साहित्य लिहून समाजासाठी अनमोल कार्य करणारे म्हणजेच अण्णाभाऊ साठे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युन्नूस तांबोळी सर यांनी केले.
यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती वतीने शाळा संग्रामनगर (माळीनगर) येथील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वही, पेन, कंपास व खाऊचे वाटत करण्यात आले.
यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी विनोद थोरात सर, इंजिनिअर कांबळे साहेब, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, केशव लोखंडे, मार्गदर्शक लांडगे सर, कांतीलाल भाले, बाळासाहेब कांबळे, उमेश भाले, रामभाऊ अडगळे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विनोद थोरात सर यांनी केले.