राज्यपाल व विधानसभा अध्यक्ष यांना मविसेचे निवेदन
प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल सी.पी.राधाकृष्ण व महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी निवेदन देवून भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर विधानसभा निवडणूक लढविण्याची आणि वादग्रस्त वक्तव्य करण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.यावेळी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे,संकेत गाडे उपस्थित होते.तसेच दिनांक १०/१०/२०२४ रोजी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार नितेश राणे यांनी गोपनीयतेची शपथ राज्य घटनेला साक्षी ठेवून घेतलेली आहे.त्यामध्ये लोकप्रतिनिधी असताना त्यांनी वारंवार मुस्लिम समाजाला लक्ष केले असल्याचे निदर्शनास आले आहे.असे निवेदनात म्हटले आहे.
राज्यात हिंदू मुस्लिम दंगल घडविण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचे जनतेतून बोलले जात आहे,त्यामुळे त्यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यात जावून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जातील अशी वक्तव्य केली आहेत,त्यामुळे लोकप्रतिनिधी असताना नितेश राणे घटनेत नमूद केलेल्या अटींचे उल्लंघन करून वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत,नितेश राणे यांचे २९ सप्टेंबर २०२४ रोजी अमरावती जिल्ह्यातील भाषण तपासावे आणि त्यांच्यावर तात्काळ निवडणूक लढविण्यास बंदी घालावी आणि त्यांच्या वादग्रस्त बोलण्यावर बंदी घालावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणावर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यात विविध जिल्ह्यात जावून नितेश राणेंनी मुस्लिम समाजाच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य करून राज्यातील वातावरण खराब करण्याचे काम केले आहे,त्यामुळे या मुस्लिम द्वेषी असलेल्या भाजपचे आमदार नितेश राणेंना विधानसभा निवडणूक लढविण्यावर व वादग्रस्त वक्तव्य करण्यावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी १० ऑक्टोबर रोजी मुंबई येथे मोठ्या प्रमाणावर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येणार आहे तरी मुस्लिम समाजातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
-किरण साठे, पक्षप्रमुख – महाराष्ट्र विकास सेना