सोडून जाती पक्ष
ते जुनेजाणते नेते
क्षणार्धात ना तोडे
मधाळ स्नेही नाते
अंतर्मुख हवे जरा
असे कसे का होते
भरोसा निखळला
होत्या नव्हते होते
लक्ष हवे दाण्यावर
दळले जाता जाते
धान्या मधे विषाणूं
किडे भरडले जाते
निष्ठावंत म्हणतात
निष्ठा धुळी मिळते
स्वच्छप्रतिष्ठाकशी
क्षण भरात मळते
खदखद जुनीआहे
कुणास ना कळते
सुप्त गुप्त गुप्तहेर
शंकामनास छळते
धुरा वरून जाणावे
कुठे काय रे जळते
अग्नीची कैक रुपे
जाळते न् उजळते
दिसता चांगली वाट
नदी तिकडेचं वळते
जाणावे प्रवाह मूळ
पुढीलआपत्ती टळते
– हेमंत मुसरीफ पुणे