दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांनी दिली पोस्टर फ्रेम भेट;२५ ऑक्टोबरला जगभर होणार प्रदर्शित
पुणे: सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र तथा लेखक,दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या मा. कॅबिनेट मंत्री ना. गणपतराव तथा आबासाहेब उर्फ गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर आधारित ‘कर्मयोगी आबासाहेब’ या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रदर्शन मा. कॅबिनेट मंत्री ना. गणपतराव देशमुख यांचे सहकारी मा. कृषीमंत्री ना. दादासाहेब जाधवराव यांच्या हस्ते करण्यात.
याप्रसंगी ना. दादासाहेब जाधवराव यांना दिग्दर्शक,लेखक अल्ताफ दादासाहेब शेख आणि सत्यशोधक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष विशाल धेंडे यांनी कर्मयोगी आबासाहेब चित्रपटाचे पोस्टर फ्रेम भेट दिली.
२५ ऑक्टोबर २०२४ रोजी संपूर्ण जगभरात हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणाऱ्या कर्मयोगी आबासाहेब चित्रपटाला प्रदर्शना पूर्वीच आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीन पुरस्कार मिळाले वर्ल्ड बुक रेकॉर्डला नोंद आहे.
कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाची इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये देखील निवड झाली आहे.परदेशात कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाचे स्क्रीनिंग झाले आहे.रसिक श्रोते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.