Site icon Tufan Kranti

झोपडीत

झोपडीत ..

गरिबांच्या झोपडीत 
निवांत बसा खुशाल 
उघड्या गरीब  पोरां
पांघरा मायेची शाल
दिखावा करणेसाठी 
घासातलेघास खालं
चार  थाळीचे  रूपडे
द्या परत जेव्हा जालं
आजू बाजूला पहावे
ते बळीराजाचे  हाल
कधीतरी दे निमंत्रण
दावा आपला महाल
बांधावरती उन्हामुळे
गाल होई  लालेलाल
यांच्या मुळे उधळला
निवडणूकीत गुलाल
कोरडीविहीर पहावी
बिसलेरी जेंव्हाप्याल
कळावे मोल घामाचे
विश्रांती जेंव्हा घ्यालं
आठव इतिहास जरा
दिलीआश्वासने काल
पूर्तता नाही वचनांची 
कधीही बदलेलं काल
– हेमंत मुसरीफ पुणे
  ९७३०३०६९९६
Exit mobile version