इंदापुर तहसीलदार हल्ला प्रकरणी तिघांना  अटक-उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ.राठोड

इंदापूर:
याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक २४/०५/२०२४ रोजी ११: १० वा. चे सुमारास श्री.श्रीकांत पाटिल, तहसीलदार, इंदापुर ता.इंदापुर जि. पुणे हे तहसील कार्यालय येथे त्यांचे ड्युटीवर शासकीय वाहन कमांक एम एच ४२ ऐ एक्स १६६१ या मधुन वाहन चालक  मल्हारी मखरे यांच्यासह जुना सोलापुर पुणे हायवे रोडवरून शंभर फुटी रोडकडे संविधान चौकातुन जात असताना समर्थ स्टुल्स् इंदापुर ता. इंदापुर जि. पुणे येथे अचानक काही इसमांनी पांढ-या रंगाची विना नंबरची काळया काचा असलेली स्कार्पीओ गाडी रोडला आडवी लावुन श्रीकांत पाटिल हे तहसिल ऑफिस येथे जात असताना सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करून त्यांचे हातातील लोखंडी रॉडने व लाल मिर्ची पावडर डोळयावर टाकुन  वाहनाच्या सर्व काचा फोडुन  जिवे ठार मारण्याचा कट रचुन प्रयत्न केल्याने इंदापुर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ४५४/२०२४ भा.दं.वि.कायदा कलम ३०७,३५३,३४१,४२७,५०४,५०६,१४३,१४४, १४७,१४८,१४९,१२०(ब) सह म.पो.का.क. १३५ प्रमाणे आरोपी नामे १) शिवाजी किसन एकाड रा.बाब्रसमळा, इंदापुर ता. इंदापुर जि. पुणे. २) विकास नवनाथ देवकर रा. सरडेवाडी ता. इंदापुर जि. पुणे. ३) पिन्या उर्फ प्रदिप कल्याण बागल ४) तेजस अनिल विर ५) माऊली उर्फ शुभम महादेव भोसेकर तिघे रा. भाटनिमगाव ता. इंदापुर जि. पुणे. व इतर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 सदर गुन्हयाचा तपास सर्वश्री डॉ. पंकज देशमुख , पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण,  संजय जाधव ,अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग, डॉ. सुदर्शन राठोड  उपविभागिय पोलीस अधिकारी, बारामती विभाग, पोलीस निरीक्षक एस.डी. कोकणे सो इंदापुर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजकुमार बुणगे हे करत आहेत.
डॉ. सुदर्शन राठोड , उपविभागिय पोलीस अधिकारी, बारामती विभाग, पोलीस निरीक्षक एस. डी. कोकणे, इंदापुर पोलीस ठाणे यांनी तात्काळ इंदापुर पोलीस ठाणेस नेमणुकीस असलेले सपोनि डुणगे, सपोनि राऊत, सपोनि पवार, पोसई राळेभात, सहा फौज. प्रकाश माने, पो हवा. काशीनाथ नागराळे, लखन साळवे, विनोद रासकर, अमित यादव, सचिन बोराटे, पो.ना.विष्णु केमदारणे, सलमान खान, पो.शि.विशाल चौधर, गणेश ढेरे, सुहास शेळके, विनोद काळे, लक्ष्मण सुर्यवंशी यांची वेगवेगळी पथके नेमुण  सदर गुन्हयातील आरोपी  १) पिन्या उर्फ प्रदिप कल्याण बागल २) तेजस अनिल विर ३) माउली उर्फ शुभम महादेव भोसेकर तिघे रा. भाटनिमगाव ता. इंदापुर जि. पुणे. यांना तात्काळ अटक केलेली आहे.
ALSO READ  हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये नियुक्ती

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000