दैनिक तुफान क्रांती.
इंदापूरे:(दि. ०१ फेब्रुवारी )
इंदापूर :- इंदापूर तालुक्यातील मौजे काटी ता.इंदापूर चे सुपुत्र व सध्या मीरा भाईंदर येथे सहाय्यक राज्यकर (विक्रीकर)आयुक्त पदी कार्यरत सन्माननिय अमोल मोहिते यांची नुतन डी वाय एस पी (पोलीस उपअधिक्षक) पदी निवड झालेबद्दल पत्रकार सुधाकर बोराटे मित्र परिवाराच्या वतीने इंदापूर येथे यथोचित सन्मान करण्यात आला.तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी व इगतपुरी नाशिक तहसील कार्यालय येथे महसुल विभागात निवासी नायब तहसिलदार या पदावर कार्यरत सौ. पुजा मोहिते यांचाही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन यथोचित सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी एड.नितीन राजगुरू (मूंबई हायकोर्ट),एड.रेखा मुसळे(मुंबई हायकोर्ट),मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र हजारे, लहुजी शक्ति सेना पुणे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ जगताप, झगडेवाडी ग्रामपंचायत मा.उपसरपंच बाळासाहेब झगडे,महात्मा फुले समता परिषद पुणे जिल्हा संघटक अशोक देवकर,इंदापूर तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष तानाजी भोंग, पत्रकार शिवाजी आप्पा पवार, पत्रकार प्रकाश आरडे,पत्रकार मुखतार काझी,पत्रकार बापुसाहेब बोराटे,मनसे इंदापूर शहराध्यक्ष सरेश व्यवहारे,अरूण मेडिकलचे सर्वेसर्वा अरूण झगडे,सागर रायकर,शिवाजी पवार, अमोल मुसळे,नितिन ढगे इत्यादी प्रमुख उपस्थित होते.