धर्माबाद प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व हाफकिडो बॉक्सिंग व जीत कुणूडो असोशियन मार्फत घेण्यात आलेले विभागीय स्तर शालेय क्रीडा स्पर्धा 30जानेवारी 2024 रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेले हाफकिडो बॉक्सिंग व जीत कुणूडो स्पर्धेत हुतात्मा पानसरे हायस्कूल चे विद्यार्थी व विद्यार्थिनी भाग घेवून राज्य स्तरीय निवड करण्यात आली आहे.यात हाफकिडो बॉक्सिंग मध्ये कु. पल्लवीहुतात्मा पानसरे हायस्कूल चे घवघवीत यश परमेश्वर टिप्रेस्वार व कु . शर्वरी दत्तात्रय सितावर कु. रागिनी काशिनाथ पांचाळ व कु. सावली श्रीदास वाघमारे कु. शरयू दत्तात्रय सितावर कु स्मिता माधव हणमंते तसेच जीत कुणूडो स्पर्धेत कु .रागिणी काशिनाथ पांचाळ व पल्लवी परमेश्वर टिप्रेस्वार व कु.शरयू दत्तात्रय सितावर व स्मिता माधव हणमंते व अनिकेत गौतम लोखंडे विभागीय स्तर प्रथम क्रमांक पटकावून विजयी विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय निवड करण्यात आले त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री रामचंद्र पाटील बन्नाळीकर सचिव श्री विश्वनाथराव पाटील बन्नाळीकर कोषाध्यक्ष श्री राम पाटील बाळापुरकर तसेच विश्वस्त मंडळ व शाळेचे मुख्याध्यापक श्री सन्मुख बेंबरेकर उप मुख्याध्यापक श्री रामेश्वर गायकवाड प्रेवेक्षक श्री मोहन पुंलकंठवार श्री नरेश जिंदमवार व ग्रँडमास्टर दत्तात्रेय सीतावार व क्रीडा शिक्षिका सौ अंजली मडके व माजी सैनिक व क्रीडा शिक्षक श्री संजय पंदिरवाड व क्रीडा शिक्षक श्री गणेश शिंदे व शाळेतील वरिष्ठ शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे पालक व तालुक्यातील क्रीडा प्रेमी या सर्व विद्यार्थ्यांचा सर्वत्र अभिनंदन व कौतुक करत आहेत.