साकेत विविध विकास कामांचे लोकार्पण व उदघाटन
व्हनाळी:
संजय घाटगे व माझ्यात अनेक वेळा विधानसभेला राजकिय लढाया झाल्या पण आमच्यात कधीही व्यक्तीगत मतभेद येवू दिले नाहीत. निवडणूक हरल्यानंतर सुद्धा ते गैबी चौकात येवून माझा सत्कार करायचे हेच आमच्या दोघातील मैत्रीचे उत्तम उदाहरण आहे. सर्वसामान्य जनतेचा शाश्वत विकास करणे हे एकमेव ध्येय ठेवून मी तालुक्यात विकास कामे केली आहेत. सर्वसामान्यांच्या विकासासाठी मी कठीबद्ध असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगून सर्वांना मैत्री दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. साके ता.कागल येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते. गेकुळचे संचालक युवराज पाटील, केडीसीसी संचालक भैया माने, गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे प्रमुख उपस्थित होते.यावेळी जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना,ग्रामपंचायत कार्यालय,अंगणवाडी लोकार्पण व बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप पालकमंत्री हसन मुश्रीफ,संजयबाबा घाटगे यांचे हस्ते झाले. तसेच गुणवंत विद्यार्थी मान्यवरांचा ग्रा.पं.मार्फत सत्कार करण्यात आला.
संजय घाटगे म्हणाले, मी शेतक-यांच्या प्रश्वनासाठी नेहमीच रस्त्यावर उतरून अनेक आंदोलने केली आहेत. सामान्य शेतकरी समृद्ध झाला पाहिजे हि माझी कायमपणे भुमिका आहे. कारण कोणत्याही सत्येपेक्षा मला लोकांचा विश्वास महत्वाचा आहे. मुश्रीफांनी अन्नपुर्णा कारखान्याला मोठी मदत केली असल्याचेही त्यांनी सांगितले. बाळासाहेब तुरंबे म्हणाले. गावच्या विकास कामांच्या पुर्ततेसाठी दोन्ही गटाची ग्रामपंचायतीमधील युती पुढील पंधरा वर्षे अबादीत राहण्यासाठी सर्वांनी एकसंघपणे राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास जयदीप पोवार,नारायण पाटील,धनराज घाटगे,मनोज फराकटे,ए.वाय.पाटील,शितल फराकटे,नानासो कांबळे,सी.बी.कांबळे,अशोक सातुसे,मारूती निऊंगरे, बापूसो पाटील,सरपंच सुशिला पोवार,उपसरपंच रंजना तुरंबे,ग्रामसेवक संजय पाटील,निलेश निऊंगरे,राजू शेंडे,तानाजी हरेल ,दतात्रय ससे,युवराज पाटील,सुजय घराळ, सदस्य माजीसैनिक, ग्रामस्त उपस्थित होते. स्वागत किरण पाटील तर आभार मोहन गिरी यांनी मानले.