राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड
धर्माबाद (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासन व पुणे युवक क्रीडा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हाफकिडो बॉक्सिंग व जीत कुणूडो बॉक्सिंग ही स्पर्धा असोशियन मार्फत विभागीय स्तरावर घेण्यात आली. ज्यामध्ये 14 वर्षाखालील वयोगटातील शालेय क्रीडा स्पर्धा पार पडली. क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेल्या हाफकिडो बॉक्सिंग व जीत कुणूडो स्पर्धेत धर्माबादच्या ग्रीनफिल्ड नॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रति-स्पर्ध्यांना हरवत हे यश संपादन केले आहे. ह्यामुळे हे विद्यार्थी विभागीय पातळीवर विजयी होऊन सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहे व ह्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. ह्यामध्ये हाफकिडो बॉक्सिंग मध्ये कु. वैष्णवी राठोड ,मानव पवार व आदित्य कुडमाटे तसेच जीत किंडो स्पर्धेत कु.विशाखा वेलादे, कु.आरुषी पवार, कु.गौरी कुडसंगे, धृप पवार आणि आयुष उईके ह्यांनी विजया सोबतच सुवर्णपदक पटकावले. विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावले आहे. ह्या विजयामुळे उपरोक्त सर्व विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. उपरोक्त सर्व खेळाडूंना कराटे प्रशिक्षक दत्तात्रय सितावार यांचे मार्गदर्शन लाभले. इकडे संस्थेचे संचालक शिवराज पा. होटाळकर, मुख्याध्यापक शेख सर, अजय सर, गोविंद पवार, दिगंबर हिंगणे, क्रीडा शिक्षक अहमद लड्डा व संजय उमडे सहित शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे पालक आणि तालुक्यातील क्रीडा प्रेमीनीं ह्या सर्व विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.