तुफान क्रांती मुरगूड प्रतिनिधी:
तमाम तरुणाईच्या आणि सिनेरसिकांच्या हृदय सिंहासनावर कित्येक वर्षे विराजमान राहिलेले बॉलीवूड चे प्रख्यात अभिनेते गोविंदा मुरगूड मध्ये जेंव्हा आले तेंव्हा त्यांच्या स्वागता चे वर्णन फक्त वरील तीन शब्दात करता येईल. ज्युलिअस सिझर बद्दल ते वापरले जायचे.
He came. He saw. He conquered…
त्यांच्या साठी विशेष संरक्षण व्यवस्था अशी नव्हतीच.त्याची त्यांना तशी गरजही नव्हती.तरी दहाबारा तरुणांनी त्यांना मुरगूड येथील ऐतिहासिक तुकाराम चौक येथे त्यांना साखळी करून त्यांचे हालगी कैताळच्या वाद्यात व्यासपीठावर आणले. त्यांनी भाषण सुध्दा केले.मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे.आज देशाला त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे.विश्वाला सुध्दा आहे.
त्यांच्यासाठी आपले अनमोल मत मागायला आलोय .शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना दिल्लीला पाठवू म्हणजे मोदीही बळकट होतील.असा त्यांच्या भाषणाचा आशय होता.शिवभक्त असलेल्या गोविंदा यांच्या विनम्र स्वभावामुळे सभेला चांगला रंग आला.
पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी सभेला संबोधून भावुक आवाहन केले. स्व.सदाशिवराव मंडलिक यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता कागलच्या या सुपुत्राला या मतदारसंघातून दीड लाखाचे मताधिक्य देऊया असे आवाहन त्यांनी सभेला केले. आमदार अमोल मिटकरी , भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे,शिवसेना जिल्हा प्रमुख राजेखान जमादार यांनीही आपले विचार मांडले. सभेला आसपासच्या तीस ते चाळीस गावातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
व्यासपीठावर गोकुळ चे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील,शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील,अविनाशदादा पाटील,माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके सुनिल सुर्यवंशी, प्रविण भोसले, रणजित सुर्यवंशी , दगडू शेणवी, नामदेव भांदीगरे, जयसिंग भोसले,एस व्ही, चौगुले अमर सनगर या सह आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक उपस्थिती होते आभार संतोष वंडकर यांनी मानले