सांगोला:
मयत व्यक्तीने सांगोला येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत करून दिलेची अनोखी घटना घडलेचे नुकतेच कागद पत्रावरून दिसुन आलेने सांगोला शहरात चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सांगोला येथील अब्दुल हमीद हे दिनांक 14 एप्रील 2022 रोजी मयत असताना त्यांचे ठिकाणी तोतया इसम उभा करून मोक्याच्या ठिकाणची जमीन दिनांक 29/5/2023 रोजी कवडीमोलाने विक्री व्यवहार करून आर्थिक लाभ करून दिलेची घटना घडली. वास्तवतः कोणताही दस्त नोंदविताना त्यातील दस्त नोंदविणारे इसमाची प्राथमीक माहिती व खात्री करणेची कायदेशीर जबाबदारी दुय्यम निबंधक यांची असताना असे बोगस व बनावट दस्त कशा प्रकारे होत आहेत तसेच या मागे मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होवुन भ्रष्टाचार बोकाळला आहे काय याची चर्चा शहरात चालु आहे.
क्रमशः