बंधूंच्या दुफळीसाठी विविध प्रलोभने-डॉ.अनिकेत देशमुख
दै.तुफान क्रांती सांगोला:
या मेळाव्याला माझ्या काळातील गर्दी पेक्षा जास्त उपस्थितीने मन भारावून गेले.तर तुम्ही जन समुदाय जे ऐकण्यासाठी जमा झाला ते सत्य म्हणजे आम्ही देघे भाऊ एकत्र होतो, आहोत आणि राहणार असे भावोद्गार डॉ.अनिकेत देशमुख यांनी काढत सभेला जमा असलेल्या जनसमुदायाची मणे जिंकली. पुढे म्हणाले आजचा मेळावा हा ऐतिहासिक असून प्रस्थापितांनी विकासाच्या नावाखाली टक्केवारीचे गणित करून लोकशाही कलंकित केली. एवढेच नाही तर आम्हा भावंडात मतभेद वाढवत आमिषे दाखविण्यात आली. आज आम्हा दोघांना एकाच व्यासपीठावर भघून आजच काय निवडणूक संपेपर्यंत त्यांना झोप येणार नाही. इतर बर्याच गोष्ठी बोलण्यासारखे आहेत त्यावर आपण प्रचरात सविस्तर बोलू, असे म्हणत कार्यकर्त्यांनी बाबासाहेब देशमुख व आबासाहेबांच्या कार्यावर विश्वास ठेवून त्यांच्या पाठीशो खंबीरपणे उभे राहावे असे आह्वान त्यांनी केले.