अमृत भारत योजनेअंतर्गत धर्माबाद रेल्वे स्थानकाचा समावेश हे खा. प्रतापराव पाटील चिखलीकरांचे यश-शिवराज पाटील गाडीवान
धर्माबाद:
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या संकल्पनेतून व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशामध्ये भारत अमृत योजनेअंतर्गत सर्व रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे
दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेबारा वाजता ऑनलाईन पद्धतीने भारताचे यशस्वी प्रधानमंत्री मा.श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या शुभहस्ते सुमारे १,५०० रेल्वे उड्डाणपूल/अंडरपाससाठी समर्पण/ पायाभरणी सोहळा आयोजित करण्यात आला होता
धर्माबाद रेल्वे स्थानकावरही या कार्यक्रमाचे मोठ्या थाटामाटा मध्ये भव्य उद्घाटनासाठी करण्यात आला . या कार्यक्रमासाठी भारतीय रेल्वे चे डि एन हे उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पोतगंटीवार भाजपचे जिल्हाप्रमुख ते शिवराज पाटील गाडीवान विष्णुकांत व्यास हेही व्यासपीठावर विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते
यावेळी शालेय विद्यार्थ्यांची घेण्यात आलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांची समायोजित भाषणे झाली. त्यामध्ये राजाराम काकांनी सहकार विद्या मंदिर यांनी प्रथम क्रमांक मिळवला होता .
ग्रीन फिल्म नॅशनल स्कूल ,विस्डम टेक्नो स्कूल, यांचाही या स्पर्धकांमध्ये समावेश होता
या गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .यानंतर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रवक्ते श्री शिवराज पाटील गाडीवान यांनी भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांचे आभार मानत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नाने अमृत योजनेमध्ये धर्माबाद रेल्वे स्थानाकाचा समावेश केल्याबद्दल खासदार साहेबांचे जाहीर आभार मानले .
भारतीय रेल्वे सध्या राज्यात रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी अनेक रेल्वे प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत.5,071 कोटी आणि 40 स्थानके जागतिक दर्जाची रेल्वे स्थानके म्हणून विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे.
भारताचे यशस्वी प्रधानमंत्री मा.श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत 500 हून अधिक रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी पायाभरणी करणार आहेत. यामध्ये धर्माबाद रेल्वे स्थानकाचा समावेश आहे पायाभरणी सोहळा दि 26 फेब्रुवारी 2024 रोजी सोमवार रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पायाभरणी सोहळा संपन्न होत असताना सर्व मान्यवरांचे आभार मानले. रवींद्र पोतगंटीवार यांनी धर्माबाद स्थानकावरील ओव्हरबीज व अंडरवेजसाठी होत असलेल्या प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला अवगत केले. विष्णुकांत व्यास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव करत रेल्वेच्या विविध योजनांचा विकासात्मक आढावा घेतला
यावेळी धर्माबाद तालुक्यातील समाज माध्यमाचे सर्व प्रतिनिधी गावातील जेष्ठ नागरिक भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ते शालेय विद्यार्थी या मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते
यावेळी रेल्वे प्रशासनाकडून सर्व उपस्थिताचे आभार व स्वागत हि करण्यात आले. धर्माबाद शहरामध्ये ओव्हर ब्रिज अंडर पास या दोन्ही कामे प्रगतीपथावर होत असून लवकरच धर्माबाद करांच्या सातत्याने गेट बंद होण्याच्या समस्येपासून दूर होणार आहेत
अमृतभारत या योजनेअंतर्गत धर्माबादच्या स्थानकाचा कायापालट होणार असून कोट्यावधी रुपयाचा निधी ह्या विकासासाठी आलेला आहे सोशल मीडियावर दोन दिवसापूर्वीच धर्माबाद रेल्वे स्थानकाच्या नवीन स्थानकाची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याने संपूर्ण धर्माबादकरां म़ध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
आपल्या शहराचा कायापालट होणारा असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून या योजनेअंतर्गत धर्माबाद स्थानकाचा समावेश केल्याबद्दल नागरिकांतून खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे आभार व्यक्त केल्या जात आहेत. यावेळी रेल्वे प्रशासनाच्या धर्माबाद रेल्वे स्थानकाचे प्रमुख मीनाकुमार हैदराबाद डिव्हिजनचे डी एफ श्रीनिवास राव, रामाषीश कुमार,धर्माबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, बुलढाणा अर्बनचे संचालक सुबोध जी काकांनी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अशोक पाटील वडजे, सनीत शकरवार, प्रवासी संघटनेचे माजी सदस्य सखाराम निलावार, साईनाथ शिरपुरे ,रामेश्वर गंदलवार, गणेश गिरी, सचिन रेड्डी, दत्तात्रय पाटील कावडे, संजय पवार, सतीश मोटकुल, अमित मुंदडा गिरीधर बुंदिले व असंख्य धर्माबाद येथील नागरिक उपस्थित होते.