पक्षनिष्ठा आणि सांगोल्यातील देशमुख घराणे

सांगोला:

21 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली आणि स्वतःचा एकनाथ शिंदे शिवसेना गट तयार केला त्यानंतर 3 जुलै 2023 रोजी अजित पवार यांनी शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि स्वतःचा अजित पवार राष्ट्रवादी पक्षा तयार केला.
यामुळे नीतिमत्ता पक्षांतर आणि एकनिष्ठता या शब्दांशी बांधले जाणारे नेते , कितपत खरे आणि कितपत खोटे याची चर्चा अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत होत आहे. अजित पवार यांच्या बंडाने पक्षनिष्ठता आणि राजकारणातील नीतिमत्ता याची चर्चा सुरू झाली आहे .हे फोडाफोडीचे राजकारण विचारात घेता महाराष्ट्रात एका नावाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
रातोरात आपली निष्ठा बदलून सत्तेच्या मागे धावणाऱ्या या काळात एक नाव कायम चर्चेत येताय ते म्हणजे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख तथा आबासाहेब. स्वर्गीय गणपतराव देशमुख तथा आबासाहेब यांचे नाव चर्चेत येण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची पक्षाशी असलेली एकनिष्ठता……….
स्वर्गीय गणपतराव देशमुख तथा आबासाहेब हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदार संघातील विधानसभेचे अकरा वेळा आमदार होते त्यांनी तब्बल अकरा वेळा मतदारसंघाचे नेतृत्व केले 55 वर्ष एकाच मतदारसंघात, एकाच पक्षाच्या तिकिटावर आणि तो पक्ष म्हणजे कायम विरोधात असलेला शेतकरी कामगार पक्ष म्हणजेच शे. का .प. स्वर्गीय गणपतराव देशमुख तथा आबासाहेब यांनी पुण्यात आपले एलएलबी चे शिक्षण पूर्ण केले आणि हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वर्गीय गणपतराव देशमुख तथा आबासाहेब सांगोल्यातील कोर्टात वकिलीचा व्यवसाय करू लागले त्यावेळेस त्यांनी बुद्धेहाळ येथील शेतकऱ्यांचा प्रश्न हाती घेऊन वकील म्हणून त्यांनी हा शेतकऱ्यांचा खटला कोर्टात मांडला आणि जिंकला. त्यामुळेच त्यांना शे.का.प मधून निवडणूक लढण्याचे निमंत्रण दिले गेले अशी स्वर्गीय गणपतराव देशमुख तथा आबासाहेब यांचा शे .का .प .मध्ये राजकारणात प्रवेश झाला आणि ते अखेरच्या श्वासापर्यंत शे. का.प मध्येच राहिले.
यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी विरोधी पक्ष असलेल्या शे.का.प मधील अनेक नेते काँग्रेसमध्ये घेऊन गेले .पुढे यशवंतराव चव्हाण हे दिल्लीला गेल्यानंतर वसंतराव नाईक हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि वसंतराव नाईक यांनीही विरोधी पक्षातील नेते काँग्रेसमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. कायमस्वरूपी विरोधी पक्ष शे.का पक्षात असणाऱ्या स्वर्गीय गणपतराव देशमुख तथा आबासाहेब यांना तुम्ही काँग्रेसमध्ये या, सोलापूर जिल्ह्यातून कोणीही मंत्री नाही ,तुम्हाला आम्ही मंत्री पद देऊ अशी ऑफर देण्यात आली .तेंव्हा गणपतराव देशमुख तथा आबासाहेब यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना निरोप पाठवला आणि सांगितले की,” आम्ही राजकारणात पदे मिळावी म्हणून कधीही आलो नाही ,आम्हाला सत्तेचे अजिबात आकर्षण नाही, माझ्याकडे काहीही नसताना मला लोकांनी मदत केली .माझे सहकारी हे जिवाभावाचे आहेत आणि माझ्या हातून हे घडणार नाही. “असे रोखठोक उत्तर गणपतराव देशमुख यांनी वसंतराव नाईक सरकारला दिले .
स्वर्गीय गणपतराव देशमुख तथा आबासाहेब यांनी दोन-तीन टर्मच नाही तर सलग अकरा टर्म शे. का.प.चा लाल बावटा हाती घेऊन सांगोला तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. 59 वर्षात एकच पक्ष, एकच झेंडा ,एकच मतदारसंघ आणि एकच चिन्ह अशी गणपतरावांची ओळख कायम जनतेच्या मनात घर करून राहिली आहे.
त्यामुळे महाराष्ट्रात सुरू असलेले राजकारण पाहता स्वर्गीय गणपतराव देशमुख तथा आबासाहेब यांच्या एकनिष्ठतेची जाणीव सगळ्यांनाच आहे. राज्यातील राजकीय भूकंपामुळे स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी स्वर्गीय गणपतराव देशमुख तथा आबासाहेब यांच्या स्मरणार्थ विचार मांडले आहेत,” आज पुन्हा आबासाहेब तुमच्या एकनिष्ठ राहण्याचे, तत्वनिष्ठ जगण्याचे मोल, आम्हाला जाणवते, तुमची ही शिकवण कधीच वाया जाणार नाही .प्रिय स्वर्गीय आबासाहेब आजचे हे चाललेले गलिच्छ राजकारण पाहिले की ,तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तुमची पक्षाप्रती ,तुमची जनतेप्रती 55 वर्षापेक्षा अधिक वर्ष निभावलेले एकनिष्ठतेचे वचन, प्रामाणिकपणाचे बंधन आणि समाजसेवेसाठी वाहिलेले जीवन आठवते. पूर्ण निष्ठेने, बुद्धीने ताकतीने ,पक्षासाठी, जनतेसाठी गोरगरीब, कामगारांसाठी तुम्ही जे काही केले. उभे आयुष्य संघर्षात घालवले त्याची प्रचिती आज येते. फक्त मतदारसंघच नाही तर अख्खा महाराष्ट्र आबासाहेब तुमचीच आठवण काढतोय. निष्ठा , चारित्र्य, सचोटी या बाबी तुम्ही स्वतः अंगीकारल्या आणि मतदारावर ही त्याचे संस्कार केले. म्हणून फक्त आपले नेतेच नाही तर मतदार संघातील तिसरी पिढी, ही सुद्धा आपल्या सोबत एकनिष्ठ आहे. आबासाहेब हे तुमच्या नावाचं गारुड जिल्हाभर इतके अफाट पसरलेले आहे की, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक माणसाला सांगोल चे देशमुख घराणे आजही आपलेसे वाटते. जीव ओवाळून टाकायचा म्हणाल तर कायमस्वरूपी निष्ठा बहाल करणारे निष्ठावंत कार्यकर्तेही अवघ्या जिल्ह्यात तुम्हीच निर्माण केलेत आणि ते कार्यकर्ते आजही आमच्या सोबत आहेत. आदर्श राजकारणाकडे कोणते पैलू असावेत या प्रश्नाचे उत्तर जर का हवे असेल तर आबासाहेब तुमच्याकडे पाहिले कि, उत्तर आपोआपच मिळते.”
स्वर्गीय गणपतराव देशमुख आबासाहेब 1962 साली पहिल्यांदा आमदार झाले .त्यानंतर 1967, 1972 ,1978, 1980 ,1985, 1990 ,1999 ,2004 ,2009 ,2014 पर्यंत ते सांगोला मतदार संघातून निवडून आले अशा अकरा विधानसभा निवडणूक जिंकणारा आमदार यापूर्वी महाराष्ट्राने, देशानेच नव्हे तर जगानेही पाहायला नाही. सर्वच पक्षाचे नेते त्यांना विधानसभेतील “भीष्म पितामह” विधानसभेतील चालते बोलते विद्यापीठ म्हणायचे .परंतु सगळ्यात महत्त्वाचे सांगायचे झाल्यास स्वर्गीय गणपतराव देशमुख तथा आबासाहेब 53 वर्षे विधानसभेत होते त्यातील तब्बल 50 वर्षे ते विरोधी बाकावर होते हा सुद्धा देशातील एक अनोखा विक्रमच म्हणावा लागेल.
स्वर्गीय गणपतरावजी देशमुख तथा आबासाहेब यांनी आपला मतदार संघ माता- पित्याच्या मायेप्रमाणे तळहातातील फोडाप्रमाणे मतदार संघातील लोकांना सांभाळले आहे. आबासाहेब कामानिमित्त महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर कोठेही गेले, तरी पक्षिणी च्या पिल्लाप्रमाणे त्यांची त्यांची नजर आपल्या मतदारसंघावर असायची. कुठेही असले तरी दररोज मतदार संघाचा आढावा घ्यायचे. ही सांगोला तालुक्यातील जनता कधीही विसरणार नाही डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना निवडून दिल्याशिवाय राहणार नाही.
स्वर्गीय आबासाहेब देशमुख यांचा विजय असो. डॉ. बाबासाहेब देशमुख आणि डॉ. अनिकेत भैया देशमुख यांना लाल सलाम…
-श्री. सूर्यगंध टी. व्ही., भारतीय संविधान प्रचारक व प्रसारक

ALSO READ  अजित पवारांनी आपल्या राजकीय संदेशाला लोकांपर्यंत पोहचण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा अवलंब केला

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000