प्रतिनिधी :नातेपुते : महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे दहिगाव शाखा अध्यक्ष सचिन खिलारे आणि उपाध्यक्ष धीरज साळवे यांनी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उप विभाग अकलूज क्रमांक १ चे लक्ष्मण डाके यांना निवेदन देवून दहिगाव ते अलंकापुरी पर्यंत कुरबावी रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे.यावेळी सनी खिलारे,नाना पवार,नाना खिलारे,किसन खिलारे,मामा अवघडे,सुनील जगताप यांच्यासह अनके कार्यकर्ते उपस्थित होते.
दहिगाव ते अलंकापुरी पर्यंत कुरबावी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत छोट्या-मोठ्या वाहना चालवणे अवघड झाले असून या रस्त्यावरती अनेक अपघात झालेले आहेत त्यामुळे या रस्त्याच्या कामामध्ये आपल्या कार्यालयामार्फत तात्काळ दखल घेऊन या रस्त्याचे काम करण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून रस्त्यावर बसून आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.