कल्याण:
विधानसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहिते पालन करण्यासाठी नेमणूक केलेल्या भरारी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी एका फुलं व्यापाऱ्यां कडून पदाचा गैरवापर करून तक्रारदार यांच्या कडे मिळून आलेली रक्कम जफ्त करण्याची व गुन्हा दाखल करण्याची भिंती दाखवून तब्बल८५हजार रुपये बेकायदेशीर उकळणा-या उल्हासनगर महानगरपालिकेच्या३कर्मचारी व २पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ‘कुंपण चं शेत, खात असल्याचे, समोर आले आहे. विशेष म्हणजे, हे प्रकरण तब्बल१३दिवसांनी समोर आल्याने या आचारसंहितेवर संशय व्यक्त केला जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,२८आँक्टोंबर रोजी पहाटे फुल व्यापारी बबन आमले आणि त्यांचा मित्र नितीन शिंदे हे कल्याण हुन अहमदनगर, पुणे जिल्ह्यातील फुलं व्यापाऱ्यांचे पैसे देण्यासाठी जात असताना त्यांना म्हारळ पोलीस चौकी जवळ आदर्श आचारसंहिता पालन करण्यासाठी नेमलेल्या भरारी पथकाने अडवले, यावेळी त्यांच्या गाडीत साडेसात लाख रुपये सापडले, त्यांना विविध प्रश्न विचारुन, हैराण करून सोडले, तुमचे पैसे परत मिळणार नाही, शिवाय तुमच्यावर गुन्हा दाखल होईल असे धमकावून यातील सुमारे८५हजार रुपये बेकायदेशीर पणे उकळण्यात आले,मात्र ही बाब स्थानिक सोशलमिडियांनी लावून धरल्यामुळेतब्बल१३दिवसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये भरारी पथकातील संदिप मनिलाल शिरसवाल, संकेत मनोहर चनपुर, आण्णासाहेब बोरुडे हे ३उल्हासनगर पालिका कर्मचारी, तर पोहवा-विश्वनाथ ठाकूर, पोना-राजरत्न बुकटे या २पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे यातील फुलं व्यापारी बबन आमले व नितीन शिंदे यांनी हे पैसे शेतकऱ्यांचे असल्याचे पुरावे, पावत्या, दाखवून देखील जबरदस्तीने,बेकायदेशीर खंडणी उकाळण्यात आल्याने आदर्श आचारसंहिते चे कसे पालन होते हे समोर आले आहे. सध्या विधानसभा निवडणुकीत पैसाचा पाऊस पडत आहे. हा पैशाचा पुर सापडला तर विनाशक अन्यथा विधायक होत आहे, त्यामुळे येथे कुंपनच शेत खात आहे, निपक्ष, भयमुक्त वातावरणात मतदान करा म्हणणा-या निवडणूक आयोगाचे यावर काय उत्तर आहे.