रुग्नालयात झाली पिण्याच्या पाण्याचा उत्तम सोय
देगलूर 🙁 प्रतिनिधी – सुभाष वाघमारे किनीकर):
देगलुर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी पाण्याच्या सोयीसाठी स्थानिक विकास आमदार निधीतून बोअरवेलच्या कामाचे भूमिपूजन आ.जितेश अंतापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्याण येथे मारलेल्या बोरवेलला भरपूर पाणी लागले असून आता येथील रुग्नालयातील रुग्नांना लवकरच मुबलक पाण्याची व्यवस्था होइल. येथील उपजिल्हा रुग्नालयात दररोज शेकडो पेक्षा जास्त रुग्नांना उपचार केले जाते. मुबलक पाण्याअभावी रुग्नांच्या नातेवाईकांना बाहेरील पाणी विकत घ्यावे लागत होते असे.सिमावर्ती भागातून ही येथे खुप मोठ्या प्रमाणात नागरीक उपचारासाठी येतात आणि येणाऱ्या रुग्नासोबत त्यांचे नातेवाईक यांना वापरण्यासाठी व पिण्यासाठी थोडीफार होणारी पाण्याची काटकसर पाहता आ.जितेश अंतापूरकर यांनी कायमस्वरुपी पाण्याची समस्या दुर केले. देगलूर उपजिल्हा रुग्नालयात बोरवेलला निधि देवून पाणी समस्या दूर केले आहेत.दरम्याण या अगोदर कै.आ.रावसाहेब अंतापूरकर यांनी रुग्नालयात रुग्नांच्या सोयीसाठी विविध यंत्रणा उपलब्ध करुन दिले आहेत.
देगलूर येथील उपजिल्हा रुग्नालयात दररोज शेकडो पेक्षा जास्त रुग्न उपचारासाठी येतात. रुग्नांच्या विविध उपचारासाठी लागणारे आधुनिक उपचार यंञना या अगोदरच कै.आ.रावसाहेब अंतापूरकर यांनी विशेष आमदार फंडातून निधी उपलब्ध करून दिले.असून मुबलक पाण्याअभावी रुग्नांना व त्यांच्या नातेवाईकांना पाण्याची चणचण भासू नये यासाठी तात्काळ स्थानिक विकास निधितून बोरवेल मारुन रुग्णलय देगलूर येथे कायम स्वरूपी पाण्याचे व्यवस्था आ.जितेश अंतापूरकरांनी करुन दिले आहे. भूमिपूजनाप्रसंगी माननीय शिवाजीराव देशमुख बळेगावकर, मोगलाजी सिरसेटवार, जनार्दन बिरादार, देशमुख, डॉ. देवणीकर व सर्व डॉक्टर कर्मचारी उपस्थित होते.