परतूर:
उमेश वैद्य
परतूर तालुक्यातील काऱ्हाळा येथे आज दि. 09/03/2024 रोजी दुपारी 4 वाजता काऱ्हाळा येथील शाम शिवाजी राठोड यांच्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये बिना परवाना बेकायदेशिर रित्या विदेशी दारू विक्री होते असल्याची माहिती आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड व त्यांच्या टीम ला मिळाली यावेळी पोउपनि चाटे पोहेकॉ 690 पालवे पोकॉ/75 चव्हाण, मयोकॉ/708 रिठे होमगार्ड 652 कडपे यांनी त्या ठिकाणी धाड टाकली असता त्या ठिकाणी एका कागदी बॉक्समध्ये 24 टुबर्ग कंपनीची विदेशी दारु 650 ML च्या सिलबंद काचेच्या बाटल्या प्रति बॉटल किं.अं.190 रुपये प्रमाणे, – 4 हजार 560/ एका कागदी बॉक्समध्ये 16 रॉयल चॅलेन्जर कंपनीच्या विदेशी दारुच्या 180 ML च्या सिलबंद काचेच्या बाटल्या प्रति बॉटल किमत 180 रुपये प्रमाणे.2 हजार 880 रुपय एका कागदी बॉक्समध्ये 21 मॅक्डॉल नं.1 कंपनीच्या विदेशी दारुच्या 180 ML च्या सिलबंद काचेच्या बाटल्या प्रति बॉटल किमत अंदाजे 150 रुपये प्रमाणे 3 हजार 150 रुपय असा एकुण 10 हजार 590 रुपय येवडा मुद्दे माल आडळून आला यावेळी शाम शिवाजी राठोड यांच्या विरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड यांच्या मार्गद्शनाखाली पुढील तपास पोहेका/690 पालवे हे करीत आहेत