आटपाडी / प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढविणार आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी आटपाडी तालुका पिंजून काढण्यास प्रारंभ केला आहे. गाठी भेटी बैठकावर जोर देऊन चांगलीच साखर पेरणी सुरू केली आहे.आटपाडी तालुक्यातील दिघंची, राजेवाडी, लिंगीवरे,विठ्ठलापूर, पुजारवाडी ,उंबरगाव, आटपाडी, खरसूंडी, तडवळे , करगनी, शेटफले, हिवतड आदी गावात जावून विविध सामाजिक , राजकीय , व्यवसायिक श्रेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या भेटी घेतल्या.
त्याच बरोबर शेतकऱ्याच्या बैठका घेवून शेतकऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेशिवाय पर्याय नाही.कोणत्याही राजकीय पक्षांकडे शेती आणि शेतकरी हा अजेंडाच नाही. त्यांना केवळ मतासाठी च शेतकरी लागतात याशिवाय सध्या चे सर्व राजकीय पक्षाचे संभाव्य उमेदवार बुडवे शेतकऱ्यांना लुटणारे आहेत. त्यामुळे त्यांना पराभूत करा असे आवाहन करून ऊस,दूध,द्राक्ष बेदाणा,कडकनाथ,घोटाळा ,जिल्हा बँक आदी प्रश्नावर केलेली यशस्वी आंदोलने आणि त्यामुळे शेतकऱ्याचा फायदा या विषयी मार्गदर्शन करून लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानीला साथ द्या असे आवाहन त्यांनी केले.
सध्याची राजकिय परिस्थितीत नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यानंतर खानापूर तालुक्यात संपर्क अभियान सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले या वेळी त्याच्या बरोबर तालुका अध्यक्ष विजय माने, जगन्नाथ मोरे,ऋषिकेश साळुंखे, प्रकाश गायकवाड, केशव शिरकांडे, मधुकर चव्हाण ,विजय शिरकांडे, निलेश नांदुगडे,बंडू घाडगे, ईश्वर माने ,नंदकुमार माने ,जीवन मोरे ,सय्यद मुलाणी ,संजय यादव, तानाजी सागर, प्रवीण सूर्यवंशी, रविराज खुडे,तुकाराम पारेकर, राजेंद्र पाटील, भुजंग पाटील, बाबुराव शिंदे आदीसह अन्य सहकारी उपस्थित होते.