आटपाडी प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी आटपाडी तहसीलदार यांना 29 1 2024 रोजी आटपाडी तालुक्यातील शिव भजन थाळीत गोलमाल केल्याचे आढळून आल्यावर केलेल्या तक्रारीनंतर अखेर आटपाडी तालुक्यातील शिव भोजन थाळीच्या तिन्ही केंद्रावर ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मानसी महिला बचत गट आटपाडी एसटी स्टँड यांना जानेवारी 2024 मध्ये 2325 थाळी पैकी 325 म्हणजे दोन हजार थाळीचे पैसे कट झाले व राधिका डायनिंग हॉल आटपाडी त्यांना जानेवारी 2024 मध्ये 2325 थाळ्या पैकी 2098 थाळ्याचे बिल मिळाले व २२३ थाळ्याचे पैसे कट झाले व हॉटेल ओम रत्न ग्रामीण रुग्णालया समोर आटपाडी यांच्या त्याचप्रमाणे जानेवारी 2024 मध्ये 2325 थाळ्या पैकी 1958 थाळ्यांचे बिल कट झाले 367 थाळांचे बिल मिळाले.
त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्यामध्ये मानसी महिला बचत गट एसटी स्टँड आटपाडी 2175 थाळ्या पैकी 2175 याळ्या वाटप केले असून 355 थाळ्यांचे दुबारा फोटो आल्यामुळे पैसे कट होऊन चौदाशे सतरा स्थळांचे पैसे मिळाले आहेत व राधिका डायनिंग हाल आटपाडी यांना 2175 थाळ्या पैकी 114 थाळ्यांचे पैसे कट झाले असून 2061 स्थळांचे पैसे मिळाले आहेत. हॉटेल ओमरत्न ग्रामीण रुग्णालय आटपाडी यांना 2175 थाळ्या पैकी 598 थाळ्याचे.चे पैसे कट झाले असून पंधराशे बेचाळीस थाळ्याचेच पैसे मिळाले आहेत. मार्च महिन्यामध्ये पंधरा दिवसाचे मानसी महिला बचत गट एसटी स्टँड आटपाडी यांचे अकराशे पंचवीस थाळी पैकी 14 थाळ्याचे पैसे कट होऊन 1019 थाळ्याचे पैसे मिळाले आहेत तसेच राधिका डायनिंग हॉल आटपाडी यांची अकराशे 25 थाळ्या पैकी 13 थाळ्याचे पैसे कट होऊन 1037 थाळांचे बिल मिळाले आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालयसमोर हॉटेल ओमरत्न आटपाडी यांना ११२५ थाळ्या पैकी 182 थाळ्याचे पैसे कट होऊन 943 थाळ्याचे बिल मिळाले आहे.
त्यामुळे झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी यश आल्याचे सांगितले आहे .तसेच पुढच्या काळात ही गोरगरिबांच्या जीवावर अन्याय झाल्यास मनसे कदापि खपऊन घेणार नाही व प्रशासनाला फसवणारे यंत्रणेला पण सोडणार असे वक्तव्य प्रकाश गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.