पंढरपुर:
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या आषाढी वारी साठी विठूची पंढरी सज्ज झाली आहे.17 जुलै 2024 रोजी आषाढी एकादशी, दशमीच्या दिवशी संध्याकाळी सर्व पालख्या पंढरपुरात दाखल होतात, चंद्रभागा नदीत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन वारकरी घेऊन प्रदक्षिणा पूर्ण करतात, पंढरपूरात येणाऱ्या वारकऱ्यांची गैर सोय होऊ नये, म्हणून नगरपरिषद स्वच्छता, आरोग्य, पाणी पुरवठा,नदी किनारी फिरती शौचालये, औषध फवारणी, आदी कामे करणार आहे, एसटी महामंडळाने बाहेर गावी जाणारी व येणाऱ्या गाड्या चे नियोजन , वेगवेगळ्या एसटी स्थानकावरून प्रवासाबद्दल माहिती देणे,या बाबतीत नियोजन केले आहे.
वारीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, वारकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महिला व पुरुष पोलीस व होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात येणार आहे., खेळणी ची दुकाने, देवाच्या फोटो ची दुकाने,पेढा, चुरमुरे,बताशे,गोड लाह्या,हळद कुंकू, अष्टगंध,अबीर,टाळ, तुळशी माळ, वगैरे वगैरे ची दुकाने वारी साठी सज्ज आहेत, सर्व दुकानदारानी आपल्या दुकानात वस्तू खचाखच भरलेल्या दिसतात.एकंदरीत आषाढी यात्रे पूर्वी आमचे प्रतिनिधी भारत कवितके मुंबई कांदिवली यांनी पंढरपूर शहरात फेरफटका मारला असता अवघ्या काही दिवसांवर आलेल्या आषाढी वारी साठी विठू ची पंढरी नगरी सज्ज झाल्याचे दिसून आले.