व्यासपीठावरकसे
कावळे करी काव
कृतीआणता मात्र
स्वताकरे अटकाव
भाषेभाषेतदुस्वास
कसाहोई प्रादुर्भाव
आम्हीचं तारणहार
मिथ्या ते हावभाव
कुणी काही करेना
दुस-यांचे घेई नांव
बोटे फक्त मोडता
राजकर्त्यांचा डाव
कॅन्हेंटमधे मुलांची
चालली धावा धाव
बोली भाषा इतर
इंग्रजी ही भरधाव
मराठी वाचवायला
चौथ्यांनी यावे राव
मराठी मज आवडे
फुके आणतो आव
इंग्रजी पगडा मना
जाई न स्थायीभाव
बदनाम भाषा होई
असूनही सुस्वभाव
जिव्हेत अन्यभाषा
पारंपरिक रे प्रभाव
लाघवी गोडमराठी
तरी न लागे निभाव
भाषेच्यामांदियाळी
मातृ भाषा किंभाव
उक्ती नसे रे कृतीत
सुप्तगुप्त ते सद्भाव
– हेमंत मुसरीफ पुणे.