माळशिरस:
माळशिरस नगरपंचायतीचे कर निर्धारण अधिकारी विकास गोरख पवार (वय ३८) यांनी बिन शेती जागेची नोंद घेऊन त्यांना मालमत्ता उतारा देण्यासाठी 1500 रुपयांची लाचेची मागणी करून सदर रक्कम कार्यालयात स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहात पकडले.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी माळशिरस नगरपंचायत हद्दीत खरेदी केलेल्या बिन शेती जागेची नोंद घेऊन त्यांना मालमत्ता उतारा देण्यासाठी नगरपंचायतीचे कर निर्धारण अधिकारी विकास पवार यांनी माळशिरस नगरपंचायत शासकीय फी व घरपट्टी २७८०/- व्यतिरिक्त १५००/- रुपये लाच रक्कम असे एकूण ४२८० रुपये मागणी केली. सदर रक्कम त्यांनी माळशिरस नगरपंचायत कार्यालयात स्वीकारले असल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे विरुध्द माळशिरस पोलीस ठाणे येथे गुन्हा नोद करण्यात आला आहे.