कल्याण:
मंत्री, आमदार, खासदार यांच्या विविध प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सत्ताधारी महायुतीत दिवसेंदिवस दुरावा वाढत असून आता याचे लोण उल्हासनगर विधानसभा तसेच कल्याण ग्रामीण भागात दिसून येत आहे, म्हारळ ग्रामपंचायत हद्दीत लावण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या’देवाभाऊ, या लाडक्या बहिणीच्या बँनरवर अजित पवार यांचा फोटो नसल्याने दादा गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष भरत गोंधळे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यात भाजप, शिवसेना(शिंदे गट)आणि राष्ट्रवादी काँग्रेस(दादा गट)असे महायुतीचे सरकार आहे, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला जबर धक्का बसला, तो त्यांनी वारंवार विविध सभामधून जाहीर पणे बोलून दाखवला आहे, यानंतर मात्र शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या आमदार, खासदार, मंत्री इत्यादींनी काही ठिकाणी जाहिरपणे तर काही ठिकाणी खाजगी मध्ये दादा मुळे ही वेळ आल्याचे सांगितले, इतकेच नव्हे तर मंत्री तानाजी सांवत यांनी तर दादा गटाच्या नेत्यांच्या मांडिला मांडी लावून बसलोतर उलट्या होतात असे संतापजनक वक्तव्य केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या पक्षाचे कार्यकर्ते,पदाधिकारी कमालीचे संतापले होते, महायुतीत दरी वाढते आहे हे बघून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि अजित पवार यांनी सारवासारव करून परिस्थिती निभावून नेली, परंतु यानंतर लाडक्या बहिणीचे बँनरवाँर समोर आले, प्रत्येकाने आपापल्या सोईनुसार या योजनेचे’ श्रेय, घेण्याची योजना सुरू केली,
दादा गटाच्या लाडक्या बहिणेच्या बँनरवरुन तर चक्क मुख्यमंत्री च गायब केले, या बँनरवर व टिव्ही वरील जाहिराती वर तिन्ही पक्षाने करोडो रुपये उधळले,यातून सत्तेत असलेल्या महायुती मध्ये सर्व काही अलबेल नाही हे समोर आले. एकमेकांच्या नाराज्या समोर येवू लागल्या, अशातच विधानसभा निवडणूक तोडांवर आल्याने तिकिटासाठी इच्छुकांची भाऊगर्दी वाढत आहे, यातून रुसवे,फुगवे,नाराजी, बंडखोरी, पक्षाला सोडचिठ्ठी, रामराम, हे समोर येवू लागले आहे, यातच विविध सव्हे मधून मविकास आघाडीला जास्त जागा मिळणार असल्याचे समोर येत आहे, त्यामुळे महायुतीतील मतभेद हे तिन्ही पक्षाला परवडणारे नाहीत हे कळून चुकले आहे, त्यामुळे ते एकमेकांना सांभाळून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.
अशातच उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात तर कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायत हद्दीत जुन्या म्हारळ पोलीस चौकी समोर लाडक्या बहिणीच्या देवाभाऊ, अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भलामोठा बँनर लावण्यात आला आहे, यावर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच फोटो आहेत, मात्र महायुतीतील अजित पवार यांचा फोटो गायब आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, दादा गटाचे जिल्हाध्यक्ष भरत गोंधळे यांनी तर उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गरज नाही असे वाटते, त्यामुळे आम्ही आमची ताकद दाखवून देऊ असे मत व्यक्त केले.त्यामुळे महायुतीतील नाराजीचे लोण आतां ग्रामीण भागात देखील पोहोचले आहे,याबाबत भाजपा आमदार कुमार आयलानी यांना विचारले असता, असे कोणी बँनर लावले असेल तर कार्यकर्ते व पदाधिकारी यांना समज देऊन तो बँनर काढून ज्यावर तिन्ही नेत्याचे फोटो असलेला बँनर लावण्यास सांगण्यात येईल असे ते म्हणाले.*