विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार म्हणाले, “आमचा विकासकामांचा ट्रॅक रेकॉर्ड महाराष्ट्रातील लोकांच्या कल्याणासाठीच्या आमच्या बांधिलकीची साक्ष देतो

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे, निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले,“आमचा विकासकामांचा ट्रॅक रेकॉर्ड महाराष्ट्रातील लोकांच्या कल्याणासाठीच्या आमच्या बांधिलकीची साक्ष देतो. निवडणुकांच्या घोषणा होताच अजित पवारांनी ट्विट केले आहे. आमचा ऐतिहासिक अर्थसंकल्प, आमचा विकासाचा रेकॉर्ड, लाडकी बहीण योजना, तीन मोफत सिलिंडर, शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी’ आमची ही कामं लोकांसमोर आहेत.

पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी सज्ज राहा असे सांगून ते म्हणाले की, आपण काळ वेळ न बघता अथक परिश्रम घेतले आहेत, आता लोकांकडे जाऊन हात जोडून मतदान मागण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांनी विधानसभा निवडणुकांच्या घोेषणांचं स्वागत केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारांशी असलेल्या आपल्या बांधिलकीला दुजोरा देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येकाचे कल्याण आणि गरिबांच्या उन्नतीसाठी समर्पित असल्याचे अजित पवार म्हणाले आहे. राज्यातील विधानसभेच्या 228 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर 2024 रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

ALSO READ  उदनवाडी कारंडेवाडी येथील शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांचा शेकाप मध्ये जाहीर प्रवेश

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000