सिरोंचा– स्थानिक शहरातील प्रभाग क्र.15 येथील पापय्या मंचार्ला यांची मुलगी कु.नागमनी पापय्या मंचार्ला वय-19 वर्षे ही दीर्घ आजाराने ग्रस्त होती.त्यामुळे तिला चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले पण दुर्दैवाने काही दिवसांपूर्वी चंद्रपूर येथे उपचारा दरम्यान तीचा मृत्यू झाला.पापय्या मंचार्ला याच्या कुटुंबाची आर्थिक परीस्थिती अत्यंत कमजोर असल्याने त्यांना आर्थिक मदतीची गरज होती.
ही माहिती स्थानिक कार्यकर्ते यांनी अहेरी इस्टेट चे दानशूर राजे तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांना दिली.त्यावेळी राजे साहेबांनी क्षणाचाही विलंब करता पापय्या मंचार्ला यांच्या घरी भेट देऊन सांत्वन करत त्यांच्या कुटूंबाला 10000/-(दहा हजार रुपये) आर्थिक मदत केली.
मी तुमच्या कुटुंबातील सुख दुःखात सोबत आहो,काही समोर अडचणी असल्यास मी सदैव सहकार्य करण्यास तत्पर राहीन असे आश्वासन यावेळी पापय्या मंचार्ला यांच्या कुटूंबाला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे सिरोच्या तालुक्यातील पदाधिकारी,कार्यकर्ते आणि मंचार्ला कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.